There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
शेन शॉ लिखीत स्मार्टकट्स या पुस्तकाने एक वेगळा विचार मांडला आहे.. लेखकाला प्रश्न पडला, की इनोव्हेटर्स (नावीन्यपूर्ण शोध लावणारे), हॅकर्स आणि आयकॉन्स यशस्वी कसे होतात, किंबहुना ते यश कसं काय मिळवू शकतात .. आणि या दिशेने जेव्हा लेखकाने विचार करायला सुरुवात केली तेव्हा त्याने त्यासाठी शेकडो लोकांच्या मुलाखती घेतल्या.. तेव्हा त्याला जे उत्तर सापडले ते म्हणजे 'लॅटरल थिंकींग' .. याचा अर्थ, ही मंडळी, पारंपरिक पद्धतीने विचार करत नाहीत, त्याऐवजी, कोणत्याही समस्येकडे वा प्रश्नाकडे बघताना व त्या प्रश्नाचं उत्तर शोधताना ते नेहमी नावीन्यपूर्ण आणि कल्पक पद्धतीने विचार करून त्या प्रश्नांची उत्तर यशस्वीरित्या मिळवतात.
जर तुम्हाला तुमच्या जीवनात, करिअरमध्ये किंवा तुमच्या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर त्याकडे एखादं मोठ्ठं कोडं असल्याप्रमाणे बघा आणि मग त्याचं उत्तर शोधण्याचा, म्हणजे त्यात यशस्वी होण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. आजवर अनेकांनी या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर असल्याचं सांगितलं आहे, ते म्हणजे मेहनत .. हार्डवर्क.. तुम्हालाही कदाचित हेच उत्तर योग्य वाटेल परंतु, हार्डवर्क करणे हे खरंतर एक आळशी उत्तर आहे असे लेखक म्हणतो, त्याऐवजी तुम्ही शॉर्टकट वापरा असं कुणी म्हटलं तर तेही उत्तर चूकच आहे. लेखक म्हणतो, की जीवनात, करिअरमध्ये, व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर स्मार्टकट्स वापरा..
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
मग हे स्मार्टकट्स म्हणजे नेमकं काय .. तर त्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं, पण थोडक्यात काही मुद्दे सांगायचे झाले तर लेखकाने अनेक अशा विचार करण्याच्या पद्धती आणि स्वतःत बदल करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला नव्याने विचार करायला भाग पाडतील.
यशस्वी व्हायचं असेल तर पारंपरिक पद्धतीने जाऊ नका, त्याऐवजी नव्या पद्धतीने विचार करा ही बाब लेखकाने पटवून देण्यासाठी ट्रेन अँड काँपीट, स्टडींग द वेव्ह्ज, क्रिएटींग युअर लक आणि असे तब्बल नऊ स्मार्टकट्स सोदाहरण पटवून दिलेले आहेत.
- नवीन कल्पना तेव्हाच सुचतात जेव्हा तुम्ही त्या प्रश्नावर आधारित निरनिराळ्या गृहितकांवर विचार करता, त्यावर प्रश्न उपस्थित करता.
- लॅटरल थिंकींग हा मेहनतीला पर्याय नाही. लॅटरल थिंकींगमुळे तुम्ही अकारण जी मेहनत करताय ती निश्चितच कट होते.. काढून टाकता येते.
- फायदा मिळवण्यासाठी काम करणे हा अतियशस्वी माणसांचा अप्रोच असू शकतो, त्यांच्या यशाचा डंका वाजवण्यासाठी..
- अनुभव नव्हे तर वेग किंवा गती हेच वैयक्तिक वा व्यावसायिक यशाचा अंदाज ठरवण्याचे साधन आहे.
- थोडेसेच कष्ट पडणार असतील तर जनरली लोक कोणत्याही गोष्टीसाठी चान्स घेऊन पहायला तयार असतात.
- Weick म्हणतो, एक लहानसे यश मिळाले की आपोआप मोठ्या यशाच्या दिशेने चक्र फिरू लागतात.
एकंदरीत या पुस्तकातून तुम्ही विचार करण्याची पद्धत अर्थात माईंड मॅपिंग शिकू शकता आणि ते तुमच्या स्वतःच्या जीवनात अप्लाय देखील करून पाहू शकता, ज्यामुळे तुमच्या जीवनात यश हे लाँगकट, शॉर्टकट न वापरता केवळ स्मार्टकटनेच तुम्हाला मिळेल..
तुमचं नशीब तुम्ही स्वतःच्या हातानीच घडवाल .. आणि तेही योग्य मार्गाने हेच या पुस्तकाचे सारांश ..!
पुस्तक मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - Salil.pro/smartcuts
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com