लैंगिक शिक्षण... लैंगिकता शिक्षण - मिथीला दळवी NetbhetTalks2022

लेक वयात आली की आपण बोलतोच तिच्याशी, पण मुलगा वयात आला की त्याला सगळं माहिती असेलंच हेच आपण गृहीत धरतो. घराघरातला हा "त्या" विषयांवरचा पाल्य पालक संवाद जो कुठेतरी नेमका अडखळलेला असतो, काय, कसं आणि किती बोलावं या गोंधळात आपण असतो, म्हणूनच आज या विषयाचे काही पैलू आज आपण समजून घेणार आहोत... मिथीला दळवी यांच्याकडून !

मिथीला दळवी Netbhet Talks च्या मान्यवर वक्त्या.

इंजिनीयर असलेल्या मिथीला या Certified counsellor व sex educator म्हणून कार्यरत आहेत. "अनघड अवघड" नावाची लैंगिकतेसंबंधीत कार्यशाळा ही पालकांसाठी त्या गेली अनेक वर्ष घेत आहेत तसंच मुलांसाठीही अशीच कार्यशाळा त्या "अनकही" या नावाने घेतात. त्यामार्फत लैंगिक शिक्षणासाठी त्या कार्य करीत आहेत.

"संवाद - a dialogue" या संस्थेच्या त्या संस्थापिका असून त्या माध्यमातून भावनिक बुद्धिमत्ता अर्थात्, emotional intelligence व sexuality अर्थात लैंगिकता या विषयीच्या कार्यशाळा त्या आयोजित करत असतात. या माध्यमातून हा विषय सोप्या आणि योग्य पद्धतीने पोचावा हाच यामागील उद्देश. 
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
https://www.netbhet.com