आत्मसंवाद हाच व्हावा सुसंवाद (#Friday_Funda)

मित्रांनो, आपण आपल्या मनाशी काय बोलतो ते फार महत्त्वाचं असतं. आपलं अंतर्मन आपण जे बोलतो ते नेहमी ऐकत असतं आणि आपल्या सूचनांचा, आपल्या विचारांचा त्यावर थेट परिणाम होत असतो. हेच विचार आपलं विश्व घडवत असतात, आणि म्हणूनच आपण आपल्या अंतर्मनापर्यंत कोणते शब्द पोचवतो त्यानुरूप आपली मनोशारिरीक जडणघडण होत असते.
आपण स्वतःबद्दल स्वतःलाच जे सांगत असतो त्यानुरूप आपली मनोवस्था ठरत असते. म्हणजे समजा, आपण आरशापुढे उभं राहून स्वतःलाच म्हटलं की मी किती सुंदर आहे, किती छान आहे .. आणि माझ्यात भरपूर आत्मविश्वास आहे.. तर पुढच्याच क्षणापासून आपल्याला तसं वाटायला लागतं. आपल्या देहबोलीतील आत्मविश्वास, चेहऱ्यावरील सौंदर्य हे आपसूकच आरशात झळकताना आपल्याला दिसू लागतं.

✔️ नकारात्मक आत्मसंवाद टाळा

👉बरेचदा आपण स्वतःच्या विचारात इतके गुंततो की आपण स्वतःबद्दल नकारात्मक विचार करतोय हे आपल्या लक्षातही येत नाही. म्हणजे, समजा आपल्याला एखादं काम वेळेत पूर्ण करता आलं नाही तर आपण लगेचच स्वतःला दोष द्यायला लागतो. आपण किती आळशी, बेजबाबदार, कामचुकार झालोय असं आपण स्वतःच्या मनाशी बोलतो. यालाच नकारात्मक आत्मसंवाद असे म्हणता येईल. हा असा आत्मसंवाद करणे नेहमी जाणीवपूर्वक टाळले पाहिजे.
त्याऐवजी, स्वतःला नेहमी सकारात्मक अभिप्राय दिला पाहिजे. उदाहरणार्थ, 'मी एक जबाबदार व्यक्ती आहे. पूर्वी माझ्याकडून कामात काही चुका झाल्या असतील पण इथून पुढे त्या होणार नाहीत याची मी काळजी घेईन. त्यासाठी मी माझ्यातील आळशीपणा सोडून देईन..' वगैरे पद्धतीच्या स्वसंभाषणाने तुम्ही स्वतःला प्रेरणा देत असता जे फार महत्त्वाचं आहे.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

✔️ स्वसंवादामुळे आत्मसन्मानावर होतो परिणाम

👉 स्वसंवाद इतका जास्त परिणामकारक असतो की त्यामुळे आपल्या आत्मसन्मानाला थेट धक्का पोहोचू शकतो किंवा तो उंचावू शकतो. या दोन्हीही गोष्टी आपल्या हातात आहेत. मनात कुढणाऱ्या व्यक्ती, सतत स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती यांच्या बाबतीत हळूहळू आत्मसन्मानाला धक्का पोहोचू लागतो व ही माणसं अधिकाधिक नकारात्मक होत जातात. त्याउलट, ज्या व्यक्तींचा स्वसंवाद छान, सकारात्मक असतो त्यांचा आत्मसन्मान वाढत जातो व परिणामी अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासपूर्ण घडते. समाजात अशा व्यक्तिमत्त्वांची एक छान ओळख निर्माण होते.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy