There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
डिजीटल आर्थिक व्यवहारांबाबत सावधानतेपासून ते सुरक्षिततेपर्यंत !
नमस्कार मित्रांनो,
डिजीटल आर्थिक व्यवहारांमध्ये हल्लीच्या काळात होत असलेली वाढती फसवणूक लक्षात घेता नुकताच आम्ही मा.श्री.चंद्रशेखर ठाकूर यांचा सावध तो सुखी हा कार्यक्रम आयोजित केला होता. डिजिटल आर्थिक व्यवहारांबाबत अगदी साध्या सोप्या गोष्टीही माहिती नसल्याने आजच्या घडीला असंख्य नागरिक या माध्यमातील फसवणुकीला बळी पडत आहेत, म्हणूनच या कार्यक्रमादरम्यान या सर्व बाबींचा आढावा घेत श्री. ठाकूर सरांनी उत्तम असे मार्गदर्शन केले. क्रेडीट कार्ड फ्रॉड, सिम स्वॅप घोटाळा, ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक, सायबर गुन्हे आणि आपल्या अज्ञानामुळे वा आपल्या मूर्खपणामुळे आपण होत असलेले गुन्हेगारांचे भक्ष्य .. या दोन्हीतील फरक अशा सर्व बाबींचा एक सर्वंकश आढावा या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आला.
मा. ठाकूर सरांनी स्लाईड्सच्या माध्यमातून केलेले हे मार्गदर्शन असंख्य लोकांपर्यंत पोचावे आणि त्यांनीही वेळीच सावध होत अशा कोणत्याही डिजीटल आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये याकरिता या कार्यक्रमाची लिंक येथे देत आहोत.
जरूर हा कार्यक्रम पहावा आणि ही लिंक आपल्या ओळखीच्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींनाही जरूर शेअर करून त्यांना देखील वेळीच सावध करावे !
धन्यवाद
टीम नेटभेट