There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
अमोल पालेकरांचा एक चित्रपट फार गाजला होता... छोटी सी बात नावाचा.. त्यातल्या हिरोला जेव्हा त्याच्या गुरूंकडून छोटी सी बात समजते त्यानंतर त्याच्या जीवनात तो खरा हिरो बनतो.. तुम्ही हा चित्रपट पाहिला असावा, आज आम्ही तुम्हाला दैनंदिन उपयोगी पडतील अशा काही सायकॉलॉजिकल ट्रिक्स सांगणार आहोत ज्यांनी तुमच्या जीवनातही तुम्ही झीरोचे हिरो होऊ शकता... किंबहुना हा लेख वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल .. अरे खरंच हीच तर ती छोटी सी बात ..
1. समोरच्याकडून त्याच्याही नकळत माहिती काढून घेणे -
जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती पूर्ण माहिती देत नाही किंवा काहीतरी लपवतेय असं वाटतं तेव्हा ही युक्ती वापरा. त्यांना प्रश्न विचारा आणि उत्तर देताना अर्धवट उत्तर आलंय किंवा काहीतरी लपवलंय असं वाटलं तर काही सेकंद शांत राहा आणि समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा. असं केल्याने समोरील व्यक्ती uncomfortable होईल आणि आपलं उत्तर अजून उलगडून सांगू लागेल
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
2. टेक अ क्विक, शॉर्ट स्नॅक ब्रेक -
एकदा दोघा मित्रांचं भांडण सुरू झालं.. एक मित्र फार हुशार होता, त्याने भांडणाच्या ओघातच पिझ्झा खायला सुरूवात केली.. तशी दुसऱ्या मित्राचं डोकं आपोआपच जरा थंड झालं आणि पुढच्या काही क्षणातच भांडण मिटलं. त्या मित्राला पुढे स्नॅक-मॅन असंच नाव मिळालं.
असं बरेचदा होतं की तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये असताना एखाद्या अवचित क्षणी वादाचे मुद्दे वर येतात. अशावेळी झटकन तुम्ही काहीतरी खाण्याच्या निमित्तानी ब्रेक घेऊन त्या वादातून दूर होऊ शकता. खरतर खाणं ही एक मन शांत करणारी activity आहे. अपॊअप वातावरण हलके करण्याची क्षमता खाण्यात आहे.
तुम्हाला माहिती असेलच की आपल्याकडे घरातली मोठी मंडळीही हे सांगतात, की कुणी जेवायच्या पानावर बसलं असेल तर त्यावेळी त्या माणसाला सुखाने जेऊ द्यावं, त्याच्याशी वाद घालायला, भांडायला जाऊ नये. ही सभ्यता लोक आजही सर्वत्र पाळतात. म्हणूनच वाद मिटवायचे असतील तर टेक अ स्मॉल इटींग ब्रेक..
3. तुमच्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना कसं पकडाल ?
काय तुम्हाला कधी जाणवतं का एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या पार्टीत किंवा एखाद्या समारंभात एखादी व्यक्ती तुमच्याकडेच लक्ष ठेऊन आहे, येताजाता त्या व्यक्तीची नजर तुमच्या मागावर आहे.. अशा व्यक्तीला कसं पकडायचं याची एक सोपी युक्ती आहे ती म्हणजे मस्तपैकी जांभई द्यायची आणि लगेच त्या व्यक्तीकडे पहायचं.. जर ती व्यक्तीही लगेच जांभई देताना दिसली तर ओळखायचं की ही व्यक्ती तुमच्यावर लक्ष ठेऊन होती. याचं कारण, जांभई ही इतकी संसर्गजन्य आहे की दुसऱ्याला जांभई देताना पाहिलं की आपल्यालाही लगेच जांभई येते.. काय म्हणता, विश्वास नाही बसत, मग एखादा फोटो पहा जांभई देणाऱ्या व्यक्तीचा लगेच बघा तुम्हाला नुसतं पाहून जांभई येते की नाही ते ..!
4. भांडणाची शक्यता कमी करा -
एखाद्या प्रसंगी जर तुमचं कोणाशी वाजणार अशी शक्यता निर्माण झाली किंवा कोणी तुमच्यावर आवाज चढवायला लागलं तर चटकन काय करायचं माहितीये..? त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन बसायचं, कारण आपल्या समोर किंवा विरुद्ध दिशेला असलेल्या व्यक्तीवर रागावणं/ ओरडणं सोप असतं मात्र आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीवर रागावणे कठीण आणि थोडसं अस्वस्थ करणारं असतं
मित्रानो, यापैकी कोणती युक्ती तुम्हाला आवडली ते खाली कमेंट्स मध्ये अवश्य लिहा आणि अशा अजून युक्त्या शिकायच्या असतील तर या लेखाचा पुढील भाग येत्या शुक्रवारी आमच्या फेसबुक पेजवर वाचायला विसरू नका
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com