There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
एका डच पत्रकाराने AI-चलित चष्म्यांचा वापर करून रस्त्यावरच्या अनोळखी लोकांना काही सेकंदात ओळखलं — चेहऱ्यांची स्कॅनिंग केली, त्यांची नावे समोर आली, एवढेच नव्हे तर त्यांचे LinkedIn प्रोफाइल पण ओपन केलं — सगळं रिअल टाइममध्ये.
हे करण्यासाठी त्याने कोणताही विशेष पोलिस डेटाबेस वापरला नाही. किंवा सरकारी यंत्रणा वापरली असेही नाही. तर फक्त सहज उपलब्ध होणारे AI tools आणि एक पत्रकार.त्याने रस्त्यावर चालणाऱ्या अनोळखी लोकांना मध्येच थांबवून पत्ता विचारला. आणि तेवढ्या वेळात चेहरा स्कॅन करून त्यांचे सोशल मीडियावरील फोटो, प्रोफाइल इत्यादी माहिती मिळवली. आणि त्यांनाच लगेच सांगितलेही
आपण आता अशा जगात प्रवेश करत आहोत का? जिथे कोणताही व्यक्ती, कोणत्याही ठिकाणी, तुमचं ओळखीचं गुपित फोडू शकतो? जिथे "पब्लिकमध्ये अस्तित्व" म्हणजे तुमचं चेहरा स्कॅन होणं, टॅग होणं, ट्रॅक होणं?म्हंटल तर हे privacy च्या दृष्टीने भयानक आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीने उपयोगी देखील आहे. मूळ प्रश्न आहे की दोघांमधील बॅलन्स कसा साधायचा ? तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही कशाला प्राधान्य द्याल...सार्वजनिक सुरक्षेला की वैयक्तिक गोपनीयतेला ? खरी भीती काय आहे माहिती आहे?
मग आपली सुरक्षा कशी करायची? ऑनलाईन आयडेंटिटी कितपत उघड करायची यावर नियंत्रण ठेवा. गैरवापर होऊ शकेल अशी माहिती सोशल मीडिया मध्ये देणे टाळा.आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलांची "डिजिटल ओळख" तयार होऊ देऊ नका. लहान मुलांचे फोटो आणि महत्वाची माहिती शेअर करू नका.
नवे धोके कोणत्या मार्गाने येऊ शकतील याबद्दल सतर्क रहा. सतत अपडेटेड राहण्यासाठी आम्हाला अवश्य फॉलो करा.
हे थांबवता येणार नाही. याचे कायद्याने नियमन केले, बंदी घातली तरीही....ज्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं आहे, ते काहीही करून वापरतील. एकदा अशा प्रकारची टेक्नॉलॉजी जगात आलं की, ते थांबत नाही.स्कॅमर्स / गुन्हेगारी प्रवृत्तेचे लोक याचा गैरफायदा घेण्याचा मार्ग शोधणारच !लक्षात आपण फक्त ऑनलाईन नाही आहोत…तर आपणच डेटा आहोत.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWKयेथे क्लिक करा.
================
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया