There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
डेव्हीड लॉरेन्स रामझी हे अमेरिकेतील सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत. ते फायनान्स अर्थात अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. द रामझी शो या रेडीओवरून प्रसारित होणाऱ्या शो मुळे ते घराघरात पोचले आहेत. त्यांनी पर्सनल फायनान्स विषयक दिलेले काही सल्ले, जे तुम्ही आचरणातही आणू शकता -
1. आपत्कालीन परिस्थितीसाठी $1000 बाजूला ठेवत चला, ही एक छोटीशीच कृती आहे परंतु अडचणीच्या प्रसंगी हेच पैसे कामाला येतात. त्यामुळे ही सवयच करा.
2. कर्जमुक्त व्हा - DEBT SNOWBALL ही रामसींनी प्रचलित केलेली पद्धत आहे. तुम्ही घेतलेल्या कर्जांची आधी परतफेड करा. त्यासाठी कमी ते जास्त रकमेचा क्रम लावू शकता.
3. पुढल्या 3 ते 6 महिन्याचा खर्च बचतीच्या स्वरूपात आजच बाजूला काढा. जर भविष्यात तुमचे प्राथमिक उत्पन्नाचे साधन हातून गेले तर तुम्ही कर्ज न घेता वा कोणापुढेही हात न पसरता, दुसरे उत्पन्नाचे साधन मिळेपर्यंत नीट जगू शकला पाहिजेत.
4. जवळपास 15 टक्के रक्कम निवृत्तीनंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवा. एकूण कौटुंबिक उत्पन्नाच्या 15 टक्के रक्कम तुमच्या कंपनीच्या निवृत्ती फंडात गुंतवा.
5. मुलांसाठी असलेल्या विशेष शैक्षणिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा.
6. गृहकर्जापासून लवकर मुक्ती मिळवा. गृहकर्ज लवकरात लवकर फेडून टाका म्हणजे अर्ध ओझं कमी होईल.
7. धनसंचय करा आणि योग्य प्रकारे धनाचा खर्च करा. जेव्हा संपत्ती वाढत जाईल तेव्हा चांगल्या कामांसाठी दान करायलाही सुरूवात करा.