There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
तुम्ही replacable आहात का ?
गेल्या महिन्याभरात जग कमालीचं बदललं. या बदलाचे गंभीर सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणाम होणार हे उघड आहे. सगळ्यात मोठा फटका आर्थिक घडी विस्कळीत झाल्यामुळे होणार आहे. जगभर साधारण 20% नोकऱ्या कमी होणार आहेत असा अंदाज बांधला जात आहे.
लॉकडाऊन नंतर पुन्हा कामावर रुजू होताना आपली नोकरी शाबूत असेल ना ही भीती प्रत्येकाला असेलच. या भीतीपासून मुक्त राहायचा एक मंत्र प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरू "सेठ गोडीन" याने त्याच्या लिंचपीन (Linchpin) या पुस्तकात दिला आहे.
सोबत दिलेल्या चित्रात, चाक निघून जाऊ नये म्हणून जी पिन लावली आहे ना त्यालाच म्हणतात लिंचपीन !
चाक ही एक सिस्टम आहे. त्या सिस्टम मध्ये लागणारे सगळेच पार्ट्स जसे की चाक, नट, बोल्ट, चकाच्या अऱ्या महत्वाचे आहेत , परंतु ही सिस्टम चालू असताना संपूर्ण सिस्टम योग्य जागी चालू राहील यासाठी लिंचपीन सगळ्यात महत्वाची ठरते.
तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी लिंचपीनचं काम करत आहात का ? तुम्ही नसताना तुमच्या सिस्टमवर किती परिणाम होणार यावरून तुमची नोकरी टिकणार की नाही, पगारवाढ होणार की नाही हे ठरते.
तुम्ही replacable आहात का ? याचा विचार करा. ज्या बिझनेस सिस्टमचा किंवा प्रोसेसचा तुम्ही भाग आहात त्यामध्ये सगळ्यात critical भाग कोणता तो शोधा आणि त्यामध्ये skills develop करा.
स्वतःला इतके valuable बनवा की कोणी तुम्हाला काढण्याचा विचारच करू शकत नाही. आणि Value ही नेहमी देण्यासाठी असते. तुम्ही value मागून मिळत नाही. Value दिल्यानेच value मिळते.
नोकरी हा तुमचा स्वतःचा बिझनेस आहे ज्यात तुम्ही तुमचा वेळ आणि कौशल्य विकता. तुमची कंपनी Customer आणि तुमचा बॉस व सहकारी Consumers. आपल्या ग्राहकाचे प्रश्न सोडवलेत तरच बिझनेस मध्ये (म्हणजे तुमच्या नोकरीमध्ये) टिकाल.
वर दिलेला हा सल्ला जे नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी ! जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुमच्याकडे काही लोक काम करत असतील तर तुमच्यासाठी सल्ला वेगळा आहे -
"कोणालाही लिंचपीन बानू देऊ नका !"
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !