There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
1. माझं जगण्यावर प्रेम आहे, मी भरभरून जीवन जगतो, मला वाटतं जीवनाचा जेव्हा भरभरून आनंद तुम्ही घ्यायला लागता, तेव्हाच तुम्ही तो इतरांना वाटू शकता. जगण्याचा आनंद घ्या आणि मुक्तहस्ते तो इतरांना वाटून टाका.
2. जर तुमच्याकडे उपजत कुशाग्र बुद्धिमत्ता आहे, पण ती वापरण्याचं कौशल्य तुम्ही शिकला नसाल तर तुमची बुद्धिमत्ता काहीच कामाची नाही हे लक्षात घ्या. कौशल्य आणि बुद्धिमत्ता यात गल्लत करू नकाबुद्धिमत्ता जी उपजत असते आणि कौशल्य जे तुम्हाला तासन्सतास सराव करून विकसीत करावं लागतं.
3. तुम्ही फक्त तुमचं आयुष्यच सुंदर करण्यावर भर देत असाल आणि इतरांचं आयुष्य सुंदर करण्याप्रती जर तुम्हाला काहीच वाटत नसेल तर तुम्ही तुमचं आयुष्य केवळ वाया घालवत आहात.
4. महानता सगळ्यांमध्येच दडलेली आहे, पण ती तुम्हाला शोधावी लागेल. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला ओळखा, तुमच्यातील महानता निश्चितच तुम्हाला सापडेल.
5. एकदा वडिलांनी मला एक मोठी भिंत दाखवली आणि विचारलं,' तू अशी भिंत बांधू शकतोस का?' मी अर्थातच 'नाही' म्हणालो. तेव्हा वडील म्हणाले, "जर तू दररोज काही विटा आणून रचत गेलास तर एक ना एक दिवस तुझी भिंत बांधून तयार होईल की नाही ?"
"जे तू करू शकणार नाहीस त्याचा विचार करू नकोस, तर जे तू करू शकतोस केवळ त्याचाच विचार कर!"
6. भीती वाटणं स्वाभाविक आहे, सगळ्यांनाच भीती वाटते, कशाची ना कशाची... मलाही भीती वाटायची, पण मी त्यावर मात केली, त्या भीतींना सामोरे जाऊन ...स्काय डायव्हिंग करताना उंच आकाशात जाणं माझ्यासाठीही तितकच भीतीदायक होतं जितकं अन्य कुणासाठी असेल, पण मी तो अनुभव घेतला.
7. तुम्हाला कधी कोणी म्हटलं नाही पाहिजे की तू अमुक गोष्ट करणार नाहीस...आणि त्यासाठीच तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. तुम्ही ती निश्चितच पूर्ण करू शकता, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची स्वप्न सुरक्षित ठेवा.
8. तुमचे विचार प्रत्यक्षात येत असतात, तुमची स्वप्न खरी होऊ शकतात. हे विश्व तुम्हाला ते सगळं देतं जे तुम्ही त्याच्याकडे मागता. म्हणून नीट विचारपूर्वक निर्णय घ्या, योग्य निवड करायला शिका, आणि जे निवडाल त्या दिशेने पुढे चालत रहा.. तुमचं लक्ष्य गाठण्यासाठी तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते ते सगळं हे विश्व तुमच्यासमोर आणून ठेवेल.