महानायक श्री अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

बॉलीवूडचे महानायक श्री अमिताभ बच्चन यांच्या अॅक्टींगमुळे तर जगप्रसिद्ध आहेतच परंतु, प्रसिद्धीच्या झोतात राहूनही अमिताभ यांनी कायम आपले पाय जमिनीवर ठेवले. ते कधीही या इंडस्ट्रीच्या ग्लॅमरला भुलून वहावत गेले नाहीत तसंच त्यांनी कधीही आपले सद्गुण सोडले नाहीत. आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार कायम आपल्या जीवनात त्यांनी प्रत्यक्षात उतरवले आणि आपल्या आचरणानी, विचारांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. 

अशा महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकण्याजोग्या काही गोष्टी - 

1. मला कधीही अपयश येणार नाही हा विचार हीच पहिली चूक असते. आज तुम्ही कितीही यशस्वी असलात तरीही कधी ना कधी तुम्हालाही अपयशाचा सामना करावा लागू शकतो. जीवनात प्रत्येकाला अपयशाचा सामना कधी ना कधी करावा लागतोच.

2. अमिताभ यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलेली एक गोष्ट त्यांनी आजन्म लक्षात ठेवली ती म्हणजे, मन का हो तो अच्छा ... ना हो तो ज्यादा अच्छा ..म्हणजेच काय जेव्हा तुमची इच्छा नसतानाही एखादी गोष्ट तुम्हाला करावी लागते तेव्हा ती त्या अज्ञात शक्तीची इच्छा आहे हे समजा आणि विश्वास ठेवा ती अज्ञात शक्ती तुमचं कधीच वाईट करणार नाही. 

3. जेव्हा परिस्थिती अत्यंत वाईट असते तेव्हा असा विचार करा की आता यापेक्षा काहीतरी चांगलं घडेल आणि आलेली वाईट परिस्थिती बदलण्यासाठी मी अथक प्रयत्न करत राहीन. 

4. एकदम मोठी झेप घेतली म्हणजेच प्रगती केली असं नाही, दररोज थोडे थोडे प्रयत्न करतही अंतिमतः यशस्वी होता येतं. महत्त्वाचं काय तर पुढे जात रहाणं आणि अंतिमतः त्या यशाबद्दल समाधानी असणं.

5. तुमचं काम तु्म्हाला चोख करता आलंच पाहिजे.कारण जोवर तुमच्या कामातच चुका असतील तर तुम्ही इतर कितीही डामडौल केलात तरीही त्याचा काहीच उपयोग नाही. उदाहरणार्थ - उत्तम पीआर केलंत, उत्तम फोटो काढलेत, पण जर कॅमेऱ्यापुढे तुम्हाला नीट अभिनय जमला नाही तर इतर कसलाच उपयोग नाही. 

6. जोवर जीवन आहे तोवर संघर्ष आहे. जीवनाचा संघर्ष कधीच संपणारा नसतो. आज कठीण वेळ आली तरीही उद्याचा दिवस येणार आहे, आज चांगले दिवस असतील तर उद्या कदाचित कठीण दिवस असू शकतो. फरक तेव्हाच पडतो जेव्हा तुम्ही हिंमत सोडत नाही आणि संघर्ष करत रहाता. 

7. नेहमीच तुम्ही पुढे आहात असं कधीच होणार नाही. तुमच्यापेक्षा उत्तम, तुमच्यापेक्षा चांगली व्यक्ती तुमची जागा घ्यायला तयार असतेच. जीवनाच्या शिडीवर नेहमीच चढाओढ सुरू असते. जेव्हा ही गोष्ट तुम्हाला समजते तेव्हा तुम्हाला यशापयशाने काहीच फरक पडत नाही. तुम्ही तुमचं काम समाधानाने व पूर्णत्वाने करू लागता. 

8. मला आजही जीवनाची आव्हानं स्वीकारायला आवडतात, प्रत्येक आव्हानाकडे मी जीवनाची संधी म्हणून पहातो. माझ्या जीवनात आलेली प्रचंड मोठी संकटं, मी पाहिलेले ते दिवस पुन्हा कधीही मला पहायला लागू नयेत ही एकच गोष्ट मला सतत कार्यरत ठेवते. 

9. अपयश, हातून घडलेल्या चुका, तुमच्यावर आलेली बिकट परिस्थिती या सगळ्यातून तुम्ही शहाणं होणं अपेक्षित असतं. जगात कोणीच असं नसेल की ज्यांच्या वाट्याला हे सगळं आलंच नसेल, मात्र या अनुभवांनी तुम्ही शहाणे झालात तरच तुमचं जीवन बदलू शकतं. 


Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy