फेसबुकचे जनक मार्क झुकेरबर्ग यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी

फेसबुकचे जनक मार्क झुकेरबर्ग म्हणतात, " जागतिकीकरणानंतर अशी अनेक माणसं आहेत जी प्रवाहाच्या खूप मागे पडली आहेत... आणि आपल्या पिढीसमोर आता हेच आव्हान आहे की आपण या जगासाठी हातात हात घालून काहीतरी उदात्त कार्य केलं पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्यापुढे असणारी आव्हानं ही कोणा एका देशापुरती मर्यादीत नसतील, तर ही आव्हानं पेलण्यासाठी सगळ्या देशांना एकमेकांच्या साथीने पुढे जाणं अपरिहार्य असणार आहे. नव्या पिढीने असं काम करायला हवंय ज्याने प्रत्येक व्यक्तीला आपली स्वप्न पूर्ण करता येणं शक्य होईल..! "
फेसबुकच्या लोकप्रियतेमागे मार्कच्या विचारांचंच भक्कम बळ आहे हे यावरून कोणालाही लक्षात येईलचं...
आज जाणून घेऊया, मार्क झुकेरबर्गकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी ...

1. प्रभावशाली व्यक्ती बना - 

केवळ एक कंपनी सुरू करणे इतकेच उद्दीष्ट नसून, प्रभावशाली व्यक्ती बनणे हे मार्कचे उद्दीष्ट होते आणि त्याने ते फेसबुकच्या निर्मितीतून साध्य केले. आपल्याही समोर असे प्रभावी उद्दीष्ट ठेवायला हवे. आपल्या पिढीसाठी असे प्रभावी काम करून दाखवणे हेच आव्हान आहे. 

2. सगळ्यांना सोबत घेऊन चला - 

जेव्हा फेसबुक झपाट्याने लोकप्रिय झालं तेव्हा अनेकजणं फेसबुक आम्हाला विकून टाक असे त्याला सुचवू लागले. पण त्याने ऐकलं नाही. मार्क अवघा 22 वर्षांचा होता त्याला जग कसं चालतं हेसुद्धा ठाऊक नव्हतं, आणि त्याच्या नकारामुळे तो नंतर एकटा पडला. तेव्हा त्याला हे जाणवलं की सगळ्यांना सोबत घेऊन चालणं किती महत्त्वाचं असतं. 

3. प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ देण्यासाठी उदात्त कार्य करा - 

पूर्वीच्या पिढ्यांनी मोठे रस्ते बांधले, धरणं बांधली, भव्य मंदिरं बांधली. त्या काळाची उदात्ततेची तीच गरज होती. आणि त्या पिढ्यांनी ती जबाबदारी पूर्णतः यशस्वी केली. आपल्या पिढीला हे सगळं करायची गरज नाही, मग आपण काय करायचंय तर आपल्याला प्रत्येकाच्या जीवनात उद्दीष्ट तयार करेल असं काम करायचंय 

4. चुका तर जन्मभर होतातंच ! - 

फेसबुक सुरू करण्यापूर्वी मार्कने इंटरनेटवर अनेक आविष्कार केले होते, पण ते तितकेसे हिट झाले नाहीत. तुम्हाला जसं चित्रपटात युरेका मूमेंट दाखवली जाते तशी वास्तवात सगळ्यांनाच मिळते असं नाही. अनेक जण चुकत चुकतच पुढे गेलेले आहेत. त्यामुळे चुका करायला घाबरू नका आणि गंमत म्हणजे तुम्ही कोणतही काम हातात घ्या, तुमची सुरुवात अडखळूनच होत असते. 

5. मोठ्या बदलांची सुरुवात छोटीच असते - 

कोणत्याही बदलाची सुरुवात ही स्वतःपासूनच होते हे तर खरंच आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, मोठे बदलही छोट्या गोष्टींपासूनच सुरू होतात. म्हणूनच आताच्या पिढीने हा बदल घडवायला हवा आहे की एक असं जग निर्माण करावं जिथे प्रत्येक माणसाकडे जगण्याचं एक निश्चित उद्दीष्ट असेल. 

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy