There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
“To err is human” अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे याचा अर्थ “माणसाकडून चुका होतातच”. ऑफिसमध्ये, घरी, मित्रांसोबत, समारंभात कधीतरी कुठेतरी आपण चुकत असतोच. आपल्याला आपली चूक कळते, त्यानंतर थोडी अपराधीपणाची भावनाही मनात सलू लागते.
मनावर संयम हवा, जिव्हानियंत्रण असावे, राग आटोक्यात असावा इत्यादी बरेच सल्ले चुका होउ नये म्हणून देण्यात येतात. पण तरी सुध्दा आपण चुकतोच. घाबरु नका, मी काही तुम्हाला असे उपदेशाचे डोस देणार नाही आहे. तर आज आपण बोलुयात चूक झाल्यानंतर (होय झाल्यानंतर, केल्यानंतर नव्हे!) ती चूक सुधारण्यासाठी कसे वागावे आणि होणारा मनस्ताप कसा टाळता येईल याबद्दल.
चूक सुधारण्याची सुरुवात होते चूक झाली आहे हे मान्य करण्यापासून. तिर्हाइताच्या नजरेने आधी आपले वागणे तपासून पहा. चूक लक्षात येईलच (अर्थात असल्यास!)
— आपल्या भावनांवर आणि मनावर नियंत्रण ठेवा. केलेल्या चुकीमुळे मन अस्थीर होऊ देऊ नका. एक मोठा श्वास घ्या आणि हळुहळु सोडा. मनाला थोडे ताजे करा.
— चूक घडून गेल्यानंतर लगेचच त्याचा विचार करु नका. अथवा प्रतिक्रीया देऊ नका. थोडा वेळ घ्या (२-३ तास) आणि तोपर्यंत दुसर्या एखाद्या गोष्टीत लक्ष गुंतवा.
— एकदा तुम्ही फ्रेश झालात की मग झालेल्या चुकीचा विचार करा. “4 Q” थीअरीचा वापर करा. म्हणजेच (Why) असे का घडले?, (which) कशामुळे घडले?, (How) जे झाले ते कसे सावरता येइल? (who) झाल्या प्रकारामुळे कोण कोण दुखावले गेले आहेत? हे चार प्रश्न स्वतःला विचारुन त्यांची उत्तरे शोधा.
— झाला प्रकार सावरण्यासाठी काही करता येईल का ते पहा. जर काही करता येण्याची अंधुकशी देखिल शक्यता असेल तर जरुर करा.
— आणि अगदीच काही करण्यासारखे नसेल तर पुन्हा अशी चूक करणार नाही हे मनाशी पक्के ठरवा.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
— झाल्या चुकीचा परिणाम सध्या हाती असलेल्या कामांवर होऊ देऊ नका. त्यामुळे जास्त चुका होण्याचा संभव असतो.
— पश्चात्ताप करुन काहीच हाती लागत नाही. आणि चिंता करुन झाले तर नुकसानच होते. म्हणून हे दोन्ही टाळा.
— Sorry म्हणा. होय हा सगळ्यात सोपा उपाय आहे. बर्याच लोकांना सॉरी (Sorry) म्हणणे कमीपणाचे वाटते. पण तसे काही नसते. आपली चूक असल्यास सॉरी म्हणण्यास काहीच हरकत नाही.
— पण फक्त नावापुरतं सॉरी म्हणून उपयोग नाही. “Saying sorry will not help, you should feel sorry” मनापासून खंत वाटली पाहीजे आणि मनापासून माफी मागितली पाहिजे.
— कधीही आपल्या वागण्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली असल्यास क्षणभर ती व्यक्ती महत्त्वाची आहे की त्या गोष्टीशी संबंधीत चूक याचा विचार करा. उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल.
— शहाणा आणि मूर्ख माणसात अथवा यशस्वी आणि अपयशी माणसात एक फरक असतो. शहाणा माणूस झालेल्या चुकांमधून धडा घेतो आणि पुढे जातो. मूर्ख माणूस एकदा केलेल्या चुकांमधून काहीच न शिकता त्याच चुका वारंवार करत राहतो.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com