There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
अदानी हे नाव सध्या सगळीकडे आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीपासून, भारतातील स्टॉक मार्केटमध्ये, बातम्यांपासून ते थेट बातम्यांच्या चॅनेलच्या hostile takeover पर्यंत सगळीकडे.
अदानी ग्रुप शक्य त्या प्रत्येक क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त गेल्या वर्षातच अदानी ग्रुप ने तब्बल 32 कंपन्या विकत (Acquisition) घेतल्या आहेत आणि यासाठे 1.3 लाख करोड रुपये खर्च केले आहेत. एवढी गुंतवणूक करण्यासाठी भरमसाठ कर्ज घेतलं आहे. अदानी ग्रुपचं एकूण कर्ज सध्या 2.3 लाख करोड रुपये इतकं आहे.(अंबानींच्या दुप्पट)
जगातील श्रीमंत माणसांच्या यादीतील माणूस एवढं कर्ज का उभं करतोय? पाहूया...
श्रीमंतांच्या यादीतील प्रत्येक व्यक्तीचा पैसा हा Paper wealth असतो, म्हणजे त्यांच्याकडे तेवढी cash नसून तेवढ्या किमतीचे stocks असतात. आता NDTV चं उदाहरण घेऊया. NDTV चे शेअर्स घेण्यासाठी कॅश उभी करायची तर अदानीला आपले काही stocks विकून पैसे उभे करावे लागले असते. मात्र त्यामध्ये Equity कमी झाली असती आणि stocks विकून आलेल्या पैशांवर टॅक्स भरावा लागला असता. त्याऐवजी अदानीने कर्ज घेऊन पैसे उभे केले. कारण कर्ज स्वस्त आहे.
पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की अदानी ग्रुप कडे खूपच कर्ज झाले आहे. जेवढी अदानी ग्रुपची कमाई आहे त्याच्या चौपट कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. आता खरी चिंतेची बाब काय आहे सांगू? अदानी आणि परिवाराची या कंपन्यांमधील स्वतःची गुंतवणूक खूपच कमी आहे.म्हणजेच या कंपन्या भविष्यात डुबल्या तरी वैयक्तिक रित्या अदानी परिवाराचे फार नुकसान होणार नाही. नुकसान होणार बँकांचे....आणि पर्यायाने बँकांमध्ये पैसे ठेवलेल्या आपल्या सारख्या नागरिकांचे !
अदानी ग्रुप खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहे. आणि ही सर्वात क्षेत्रे खूप जास्त कॅपिटल ची आवश्यकता असणारे आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी आधी खूप सारा पैसा गुंतवावा लागतो आणि त्यानंतर काही वर्षांनी त्याचा परतावा मिळायला लागतो. भविष्यातील काही घडामोडी मुळे हा परतावा मिळेलच याची देखील खात्री देता येत नाही. आपण यापूर्वी Reliance infra, GMR infra यांच्या बद्दल पाहिले आहेच.
गेल्या वर्षी जिथे stock market index 40% वाढली तिथे अदानी ग्रुपचे stocks 700% ते 1300% ने वाढले आहेत. म्हणजेच शेअर मार्केट मध्ये अदानी ग्रुपला पसंती मिळत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की म्युच्युअल फंड्स ने मात्र अदानी stocks कडे पाठ फिरवली आहे. अदानी ग्रुप मध्ये म्युच्युअल फंडस ची गुंतवणूक केवळ 0.76% आहे. म्युच्युअल फंड्स ना जास्त नफा कमवायचा नाही का ? मग ते का या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत नाही? कारण सोपे आहे. म्युच्युअल फंडस् कंपनीच्या फुगवलेल्या valuations मूळे, खूप जास्त कर्जामुळे, भविष्यात कदाचित होणाऱ्या नफ्यासाठी आता अनिर्बंध गुंतवणूक करण्याच्या अदानी ग्रुपच्या मॉडेलमुळे यापासून दूर राहणे पसंत करत आहेत.
=========================
✅ रिलायन्सने कोणालाही लक्षात नसलेला कॅम्पा कोला हा dead brand का विकत घेतला ?
✅ अदानी ग्रुप भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे का?
✅ 4000 करोडचा घोटाळा ज्याबद्दल कोणीच काही बोलत नाही !
✅ खिशाला परवडतील अशा खऱ्या हिऱ्यांची बाजारपेठ (Lab grown diamonds)
✅ जपान मध्ये तरुणांनी अधिक दारू प्यावी म्हणून तिथलं सरकार प्रयत्न करतंय ! का ते जाणून घ्यायचंय ?
या व अशा अनेक विषयांवर लेख प्रकाशित होणार आहेत नेटभेट च्या व्हाट्सअप्प ग्रुपमध्ये ! आजच जॉईन करा. 93217 13201 या नंबर वर JOIN असा मेसेज पाठवा !
=========================
पण खुद्द गौतम आदनींना याची चिंता नाही कारण अदानी ग्रुप आता too big to fail झालेला आहे. म्हणजे जर सरकारने आणि बँकांनी आणखी कर्ज नाकारले आणि अदानी ग्रुपच्या कंपन्या डुबल्या तर मार्केटमध्ये मोठा क्रॅश येईल. आणि त्यामुळे होणारे नुकसान अतोनात असेल. ते टाळण्यासाठी अदानी ग्रुप चालत राहावा ही आता सरकारसाठी पण महत्वाची गोष्ट ठरली आहे. आणि म्हणून आदनींना अजून कर्ज मिळतच राहणार आहे.
थोडक्यात अदानी ग्रुप कर्ज घ्यायचं थांबला नाही किंवा येत्या काही वर्षांत अदानींच्या कंपन्या नफा कमवायला लागल्या नाहीत तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या पोटातला हा एक जीवंत बॉम्ब ठरेल....जो कधीही फुटू शकेल !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com