मित्रांनो,
आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. प्रत्येक क्षणाला या जगातून कोणी ना कोणी कायमचा निरोप घेत असतं. जीवन आणि मरण हे चक्र सतत सुरू आहे.. "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे" हे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहेच आणि आपण स्वतःही याच रांगेचा भाग आहोत, आपण पुढे पुढे सरकत आहोत. आपल्याही नकळत. आपण आपलं जीवन जगतोय. रोज नवा दिवस येतोय, रोज नवी रात्र होतेय .. असंच हे जीवनचक्र सुरू आहे. या चक्रात आपणही अखंड पुढे जातोय..
आपल्याआधी कितीजण आहेत ते आपल्याला माहीत नाही, तसंच या रांगेत आपल्या नंतर आपल्यामागे कोण आहे हे देखील आपल्याला ठाऊक नाही. या रांगेतली आपली जागा आपण स्वतः बदलू शकत नाही, ना आपण पुढे जाऊ शकतो, ना मागे रेंगाळू शकतो, आणि कितीही वाटलं तरीही या रांगेतून आपली सुटका नाही. ना आपण इथून बाहेर पडू शकतो, ना ही रांग टाळू शकतो. म्हणूनच या रांगेत आपला नंबर येईपर्यंत, चला -
👉 क्षण क्षण आनंदी राहूया,
👉 क्षण क्षण भरभरून जगूया.
👉 आपला प्राधान्यक्रम ठरवूया.
👉 वेळेचा सदुपयोग करूया.
👉 आपल्याला जे मिळालंय त्याचा आदर करूया, अभिमान बाळगुया.
👉 स्वतःला 'खास' अशी ओळख मिळवून देऊयात.
👉 कोणीच नसण्यापासून ते कोणीतरी असण्यापर्यंतचा स्वतःचा प्रवास जाणीवपूर्वक करूयात.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
👉 आपला आवाज जगाने ऐकावा एवढे आपले यश खणखणीत मिळवूयात.
👉 छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मिळवूयात.
👉 कोणाच्यातरी चेहऱ्यावर हास्य फुलवूयात. कोणाला तरी आनंद वाटूयात.
👉 बदल घडवूयात.
👉 प्रेम करूयात. प्रेम मिळवूयात.
👉 अपरंपार शांततेचा अनुभव घेऊयात.
👉 आपण इतरांना याची जाणीव करून देऊयात, की त्यांना इथे प्रेम मिळेल.
👉 आपल्यापाशी पश्चात्ताप करण्याची एकही गोष्ट नसेल..आपण भविष्यासाठी कायम तयार असू.
जर तुम्हाला जीवन भरभरून जगायचं असेल तर आणि जीवनाने दिलेल्या प्रत्येक अद्भूत गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल आणि स्वतःचं बेस्ट व्हर्जन व्हायचं असेल तर जीवन अशाप्रकारे जगूया...
बघा तुमचं जीवन उमलतं की नाही .. !
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया