There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
शाळेत असताना मी हमखास रेडीमेड प्रश्नोत्तरांची गाईड्स वापरायचो. "सगळी उत्तरं पुस्तकातच असतात" हे माहीत असूनही त्या पुस्तकातली उत्तरं क्रमवार आणि शोधायला सोपी अशी मांडल्यामुळे गाईड्स फारच पॉप्युलर झाली. Productivity मध्ये तेव्हा देखील भलताच विश्वास असणारा मी त्यामुळेच गाईड्स चा चाहता होतो.
पुढे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मात्र थेट उत्तरं मिळणारी गाईड्स उपलब्ध नव्हती. पुस्तक वाचून त्यातून हवी ती उत्तरे शोधणे वेळ खाऊ आणि कठीण वाटत होतं. अशावेळी वाटायचं की सरळ या पुस्तकालाच प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर सांगितलं तर किती बरं होईल?
तेव्हा काही ती सोय मला मिळाली नाही पण आत्ता Artificial Intelligence ने मात्र ही सोय उपलब्ध करून दिली आहे. मित्रांनो आज जे टूल मी तुम्हाला सांगणार आहे ते इतके भन्नाट आहे त्याच्या नंतर तुम्ही प्रत्येक वेळी ते वापरल्याशिवाय राहणार नाही.
या जबरदस्त AI टूलचे नाव आहे ChatPDF .com
आपल्याला जे डॉक्युमेंट किंवा पुस्तक समजून घ्यायचं आहे त्याची पीडीएफ कॉपी ChatPDF मध्ये जाऊन अपलोड करायची. मग chatPDF ती पीडीएफ समजून घेण्यासाठी दोन-तीन मिनिटे घेईल आणि त्यानंतर तुम्ही त्या पीडीएफ बद्दल पाहिजे ते प्रश्न चॅट-पीडीएफ ला विचारू शकता. आणि त्याचे उत्तर तुम्हाला थेट मिळेल.
म्हणजेच पुस्तकंच थेट बोलायला लागतील. आहे की नाही भन्नाट !
केवळ पुस्तकच नव्हे तर एखादं लीगल अग्रीमेंट असेल, प्रोसेस मॅन्युअल असेल, रिसर्च पेपर असेल या सगळ्यां साठी आपण चॅट पीडीएफ वापरू शकतो.
============================
➡️ मराठी माणसाला AI युगासाठी तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न !
AI जगतातील अशा अनेक घडामोडी आणि युक्त्या सोप्या मराठीत आणि विनामूल्य समजून घ्यायच्या असतील तर आजच आमचा नेटभेट AI मराठी माहिती हा whatsapp ग्रुप जॉईन करा. 📚
https://chat.whatsapp.com/LaEMHKblZFy1Mwn4g5IIvR
============================
मी या टूलचा आणखीन एक वापर करतो. जे झूम कॉल किंवा ऑनलाईन मीटिंग होतात त्यामध्ये एक वेळी शंभर टक्के फोकस ने प्रत्येक गोष्ट ऐकली जाईलच असे नाही. मी अशा मीटिंगची ट्रान्सस्क्रिप्ट पीडीएफ फॉर्मेट मध्ये डाऊनलोड करून घेतो आणि ती Chatpdf ला देऊन मग मीटिंगमध्ये काय झालं?कोण बोललं? काय बोललं काय ठरलं याचे प्रश्न विचारतो.
एवढंच नव्हे तर जगातील 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये ChatPDF वापरता येतं. मी मराठीत वापरून बघितलं त्यामध्ये अगदी उत्कृष्ट असे रिझल्ट मिळाले नाहीत पण काम चालू शकेल इतपत रिझल्ट होते. पण इंग्रजी डॉक्युमेंट्स मध्ये तर हे 100% परफेक्ट काम करत होता.
खूप उपयोगी असलं तरी काही खाजगी आणि सेन्सिटिव्ह माहिती असलेल्या pdf फाइल्स मात्र येथे बिलकुल अपलोड करू नका. सध्या chatpdf मध्ये कमी free आणि 5 डॉलर्स ला paid plan आहेत.
हे टूल वापरून बघा आणि कसे वाटले ते मला नक्की कळवा.
धन्यवाद,
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !