यूट्यूबवरून व्हिडीओ डाऊनलोड करण्याच्या काही सोप्या पद्धती

#Techie_Tuesday

यूट्यूबवरून व्हिडीओ डाऊनलोड करून ते नंतर तुम्ही तुमच्या वेळेनी पाहू शकता हे बरेचजणांना ठाऊक नसेल. पूर्वी यूट्यूबवरून सगळे व्हिडीओ डाऊनलोड करून ते तुम्हाला तुमच्या फोनमध्ये अथवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करणं शक्य होतं पण आता तो पर्याय यूट्यूबने बंद केलेला आहे. मात्र त्याऐवजी तुम्हाला यूट्यूबवरच तो व्हीडीओ डाऊनलोड करून नंतर तुम्ही ऑफलाईन असताना पहाण्याचा पर्याय त्यांनी खुला करून दिलेला आहे.
असं असलं तरीही, यूट्यूबवरून व्हिडीओ डाऊनलोड करण्याच्याही काही पद्धती आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया अशा तीन पद्धती ज्यांनी यूट्यूबचे व्हिडीओ तुम्ही डाऊनलोड करू शकता.

1. ऑफलाईन व्ह्यू हवा असेल तर यूट्यूबवरील ज्या व्हिडीओचा ऑफलाईन व्ह्यू हवाय तो सुरू करा. त्याच्या खाली तुम्हाला काही पर्याय दिसतील. त्यातच तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करताच तो व्हिडीओ डाऊनलोड होण्यास सुरुवात होईल. हे व्हिडीओज तुम्हाला यूट्यूबच्या तुमच्या लायब्ररी सेक्शनमध्ये सापडतील. जेव्हा तुम्हाला इंटरनेटचं कनेक्शन नसेल किंवा नेटवर्क इश्यू असतील तेव्हा तुम्ही हे डाऊनलोड केलेले व्हिडीओज नंतर पाहू शकता.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

2. स्नॅपट्यूब नावाचं एक थर्ड पार्टी एप डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूबवरचे व्हिडीओ डाऊनलोड करून ठेऊ शकता. या एपच्या मदतीने तुम्ही यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि अशा अन्य अनेक वेबसाईटवरून व्हिडीओ डाऊनलो करून तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करून ठेऊ शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच करावं लागतं की स्नॅपट्यूबच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आणि ते एप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करून घ्यायचं. (snaptubeapp.com) त्यानंतर तुम्हाला यूट्यूबवरून हवे ते व्हिडीओ तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करून ठेवता येतील. मात्र, हे करताना एक काळजी घेणे अत्यावश्यक आहे ती म्हणजे तुम्ही जो व्हीडीओ डाऊनलोड करणार आहे त्याला डाऊनलोडींगची अधिकृत परवानगी त्याच्या निर्मात्याने दिलेली आहे अथवा नाही ते नीट काळजीपूर्वक तपासणे अत्यावश्यक आहे, अन्यथा तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता.

 

3. आता जर तुम्हाला असं कोणतंही एप वगैरे तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड न करताच यूट्यूबचे व्हिडीओ डाऊनलोड करायचे असतील तर त्यासाठी एक वेबसाईट आहे तिचा वापर तुम्ही करू शकता. en.savefrom.net या वेबसाईटवर जाऊन तुमच्या व्हीडीओची लिंक कॉपी पेस्ट करायची डाऊनलोडवर क्लिक करायचं की क्षणार्धात तो व्हीडीओ तुमच्या फोनमध्ये सेव्ह झालेला दिसेल.
 
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com