गुरुपौर्णिमा 2022

'गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा !'
गुरु आपल्याला काय काय देतात ...? तर सारं काही देतात.
सुख, यश, किर्ती, समृद्धी, उत्कर्षाची कवाडं तेच आपल्यासाठी खुली करून देतात.
त्यांच्या परीसस्पर्शाने आपण उजळतो, आपले जीवन त्यांच्या नुसत्या स्मरणानेही पावन होते.
अशी ही गुरुंची महती, ती वर्णन करताना शब्दही अपुरे पडतात... !
केवळ निःस्सीम भक्ती आणि अपार प्रेम, करूणेने भारलेल्या अशा जगद्वंदनीय समस्त गुरुंना आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी टीम नेटभेटकडून सादर वंदन

टीम नेटभेट

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया

learn.netbhet.com