भारताचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे काही मौल्यवान प्रेरणादायी विचार ..

भारताचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे काही मौल्यवान प्रेरणादायी विचार ..

1. विज्ञानाच्या आधाराने लोकांच्या जीवनातील दुःख आणि वेदना कमी करण्यातच खरा आनंद दडलेला आहे. विज्ञानाने लोकांच्या जीवनात आनंद पेरावा, त्यासाठी या क्षेत्रातील लोकांनी काम करत रहावे. 

2. आपल्या देशात आपण आता कल्चर ऑफ एक्सलन्सचा ध्यास धरला पाहिजे. अर्थात, कोणतीही गोष्ट सर्वोत्कृष्ट पद्धतीने करण्याची संस्कृतीच आपण निर्माण केली पाहिजे. सर्वोत्कृष्टता ही अपघाताने नव्हे तर सातत्याने मिळवण्यासाठी आपण कष्ट घेतले पाहिजेत. 

3. काय आहे कल्चर ऑफ एक्सलन्स ? दररोज स्वतःशीच स्पर्धा करत स्वतःला सर्वोत्कृष्टतेच्या दिशेने पुढे नेत रहाणं. कालपेक्षा अधिक चांगलं करत रहाणं आणि स्वप्न बघणं. स्वप्नपूर्तीसाठी लक्ष्य ठरवणं, एक लक्ष्य साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष्य स्वतःपुढे पुन्हा ठेवणं आणि अशाप्रकारेच जगत रहाणं... यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजणच झळाळून उठेल. 

4. सगळ्यांना एकेकच ह्रदय देवाने दिलेलं आहे. मात्र डॉक्टर होणार असलात तर तुमच्याकडे दोन ह्रदयं निश्चित हवीतच. एक बायोलॉजिकली असलेलं आणि दुसरं म्हणजे सह्रदय... किंवा दयाळू ह्रदय .. हे लक्षात ठेवा.

5. लोकांनी तुम्हाला स्मरणात ठेवावं यासाठी तुम्ही तसं भव्य काम करणं अपेक्षित आहे. पण मग हे काम कोणतं जे केल्यानी तुम्ही इतिहासात सुवर्णपान जोडू शकाल ? 

इतरांपेक्षा निराळा विचार करण्याची क्षमता जेव्हा तुमच्यात निर्माण होईल, आणि तुमची महत्त्वाकांक्षा हीच तुमची दृष्टी होईल तेव्हाच !

6. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक भावी डॉक्टरकडे हे 6 गुण असलेच पाहिजेत - 

- औदार्य

- नैतिकता

- सहिष्णुता

- चिकाटी

- शुद्ध एकाग्रता

- बुद्धिमत्ता आणि ज्ञान 


Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy