Google ने नुकताच भाषेचा मोठा अडथळा नष्ट केला !

Google ने नुकताच भाषेचा मोठा अडथळा नष्ट केला आहे – आणि ही फक्त सुरुवात आहे!

कल्पना करा तुम्ही बोलताय मराठीत… पण समोरच्याला ऐकू जातंय स्पॅनिशमध्ये – तेही LIVE!”नुकत्याच झालेल्या Google I/O 2025 मध्ये सुंदर पिचाई यांनी अनेक नव्या फीचर्सच्या घोषणा केल्या. त्यापैकी एक ही आहे.हे केवळ तांत्रिक प्रगतीचं उदाहरण नाही – हा जगातल्या संवादाच्या परिभाषेतला मोठा बदल आहे.Google Meet मध्ये आता **real-time, AI-based translation उपलब्ध आहे. हा फक्त शब्दांचा अनुवाद नाही तर भाषेच्या पलीकडे जाऊन आवाजाचा टोन, संदर्भ, भावना, हावभाव यांचं भाषांतर आहे.---

## हे नक्की कसं काम करतं ?

  • Google Meet मध्ये आता Multimodal AI वापरण्यात आलंय.
  • म्हणजे आपण जे बोलतो ते फक्त “शब्दशः” नाही ऐकलं जात. 
  • AI आता तुमचा चेहरा, आवाजाची लय, आणि अगदी वाक्य रचनेतील सूक्ष्म बदल लक्षात घेतं — आणि त्या सर्व गोष्टींचं भाषांतर करतं contextually !
  • यासाठी Google चं Gemini AI वापरण्यात आलंय – जे ChatGPT ला थेट टक्कर देतंय. 
  • हा AI केवळ Text वर काम करत नाही — तो आवाज, चेहरा, हावभाव, लिप मूव्हमेंट, आणि संवादाचा संदर्भ एकत्र समजून निर्णय घेतो.
  • सध्या सुरुवात झाली आहे इंग्रजी ⇄ स्पॅनिश या दोन भाषांमधून ! 
  • पण Google च्या मते खूप लवकरच यामध्ये जगभरातल्या भाषा येणार आहेत.ही सेवा Google One AI Premium (₹1600/माह) या सबस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK येथे क्लिक करा.

================

## ही इतकी मोठी गोष्ट का आहे?

  • कारण यापुढे जागतिक संवादात “भाषा” ही अडचण राहणार नाही.
  • एक जपानी प्रोफेसर फ्रेंच विद्यार्थ्यांना शिकवू शकतो 
  • मराठी बिझनेस कोच कोलंबियात सेशन घेऊ शकतो
  • तुमची मुलं कोरियन बालकथांचं थेट भाषांतर ऐकून शिकू शकतात
## एक भविष्यदृष्टी…

भाषा म्हणजे ओळख, संस्कृती, आणि माणसाचा दृष्टिकोन/भावना व्यक्त करण्याचं माध्यम. जसे आपण सारे मराठी जाणणारे लोक एकमेकांसोबत जोडले गेलो आहोत...तसेच मराठी न जाणणाऱ्यांसोबत आपण दुरावले आहोत हे ही खरे !पण जर तंत्रज्ञानाने हा दुभंगलेला पुल जोडला – तर आपण केवळ संवाद करणार नाही… तर आपण जोडले जाऊ ! "हे विश्वाची माझे घर" ही ज्ञानेश्वर माऊलींची उक्ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरू शकते.या अपडेटसोबत एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की AI आता केवळ "स्मार्ट" बनत नाहीतर "संवेदनशील" बनत आहे. अर्थात या सिस्टीममध्ये अधूनमधून चूक होऊ शकते. पण दिशा योग्य आहे. आपल्या व्यवहारांवर, भाषेंवर, संस्कृतीवर याचे परिणाम कसे असतील ? तुम्हाला काय वाटतं ? कमेंट्स मध्ये अवश्य सांगा !

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK येथे क्लिक करा.

================

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !