There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
AI च्या मदतीने 🤖 चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळवण्याची शक्यता 🌟 वाढवायची आहे ?
तर मग हे वाचा. 👀 आणि नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येकाला हे पाठवा ! 📩
नोकरी शोधण्याची जूनी पद्धत म्हणजे 🗂️ बायोडाटा तयार करायचा, नोकरीसाठी जागा कुठे उपलब्ध आहे ते शोधायचे आणि बायोडाटा पाठवून उत्तराची वाट पाहायची. 👓 पण मित्रांनो, बहुतेकांच्या हे लक्षातच आलेले नाही की आपण पाठवलेला बायोडाटा एक माणूस नव्हे तर मशीन पाहत आहे. 🤖 त्यात काय लिहिलेले आहे हे न वाचता त्यात अपेक्षित keywords नसतील तर तो बायोडाटा पहिल्याच फेरीत बाद करण्याची जबाबदारी सॉफ्टवेअर (मशीन) करत असते. 📝 त्यानंतर तो बायोडाटा माणसाकडे जात असतो. 👤
आता नवीन पद्धत बघूया.
Step 1
सुरुवात आपल्या बायोडाटा पासून नव्हे तर आपण कोणत्या जॉब प्रोफाइल साठी आवेदन करणार आहोत हे पहा. 👀 त्यासाठी सर्वोत्तम स्रोत आहे Linkedin.com. 🌐 linkedin मध्ये विनामूल्य प्रोफाइल बनवा आणि आपल्याला हव्या तशा नोकरीचे प्रोफाइल शोधा. Job Description कॉपी करून घ्या. 📄
Step 2
chatgpt मध्ये जा. ( https://chat.openai.com ) आणि तिथे prompt लिहा.
create a suitable resume for above job profile. ensure relevant keywords are used.
या वाक्याच्या पुढे linkedin मधून कॉपी केलेले job description लिहा.
आणि पुढे तुमची माहिती द्या (नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव इत्यादी)
(chatgpt कसे वापरायचे ते माहित नसल्यास हा व्हिडिओ पहा - 🎥 https://www.youtube.com/watch?v=zYIVjDFmYLE )
Step 3
त्यानंतर https://instaresume.io/ या AI tool मध्ये जाऊन वरील बायोडाटा कॉपी पेस्ट करा. instaresume तुमच्या बायोडाटा ला आकर्षक बनवेल आणि मुद्देसूद बांधणी (proper structure) करेल. 📊
Step 4
त्यानंतर https://skillsyncer.com/ या वेबसाईट वर जाऊन आपण नवीन बनवलेला बायोडाटा अपलोड करा. तिथे या बायोडाटाला स्कॅन करून एक keyword score दिला जाईल. 📈 कोणते keywords बायोडाटा मध्ये नाही आहेत, कोणते नको आहेत आणि काय सुधारणा करता येतील ते सांगितले जाईल.
त्यांनी सुचवलेल्या सुधारणा करून फायनल बायोडाटा तयार करा. 📝
Step 5
आता असा प्रत्येक पोझिशन साठी customize केलेला बायोडाटा नोकरीसाठी अप्लिकेशन करताना पाठवा. 📨 तुमचे मुलाखतीसाठी येणारे कॉल्स नक्की वाढतील. ☎️ आणि हो, AI वापरून मुलाखतीची तयारी देखील करता येते. 🤖 कसे ते पाहूया पुढील लेखात.
============================
➡️ AI जगतातील अशा अनेक घडामोडी आणि युक्त्या सोप्या मराठीत आणि विनामूल्य समजून घ्यायच्या असतील तर आजच आमचा नेटभेट AI मराठी माहिती हा whatsapp ग्रुप जॉईन करा. 📚
https://chat.whatsapp.com/LaEMHKblZFy1Mwn4g5IIvR
============================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! 📚🚀
www.netbhet.com
सर्वाना मनासारख्या नोकरीसाठी शुभेच्छा ! 🍀 यशस्वी भव ! 🌟