There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
फेसबुक बिझनेस पेज सुरू करण्यासाठी या सोप्या 10 पायऱ्या - (#Biz_Thirsday)
फेसबुकचा वापर करून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये खूप मोठी झेप घेऊ शकता असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण, नव्या काळातील नवं ताकदीचं माध्यम म्हणजे फेसबुक. या फेसबुकवरून तुम्ही तुमचा जनसंपर्क झटक्यात वाढवू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठीही फेसबुकचा वापर करून घेऊ शकता.
हा वापर कसा करायचा यासाठी या 8 सोप्या पायऱ्यांचा अवलंब करा -
1. फेसबुकवर तुमच्या व्यवसायाचं पेज सुरू करा -
फेसबुकवर पेज सुरू करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा (https://www.facebook.com/pages/creation) फेसबुक तुम्हाला दोन पर्याय देते, बिझनेस ऑर ब्रँड पेज आणि कम्युनिटी ऑर पब्लिक फिगर.
या दोन्हीही प्रकारापैकी तुमच्यासाठी योग्य असलेला पर्याय निवडा कारण, या दोन्हीही पर्यायांसाठी फेसबुककडून वेगवेगळी सेटींग्ज दिली गेलेली आहेत. त्यामुळे योग्य तो पर्याय निवडून त्यात पेज नेम, कॅटेगरी, अड्रेस व अन्य तपशील भरा.
2. प्रोफाईल पिक्चर -
तुमच्या व्यवसायाशी संबंधित प्रोफाईल पिक्चर तुमच्या पेजला लावा. यामध्ये तुम्ही अगदी तुमच्या ब्रँडचा लोगोसुद्धा प्रोफाईल पिक्चर म्हणून लावू शकता. यामुळे लोकांना चटकन तुमच्या ब्रँडशी कनेक्ट होता येईल. हे प्रोफाईल पिक्चर बरेचदा गोलाकारातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवलं जात असतं त्यामुळे तुमच्या ब्रँडचा लोगो शक्यतो याच आकारात योग्य प्रकारे दिसेल असा तयार करून घ्या.
3. कव्हर फोटो -
कव्हर फोटो म्हणजे पेजवर सगळ्यात वर लोगोच्या बाजूला आयताकृती जागेमध्ये लावण्यात येणारा फोटो. हा फोटो अतिशय समर्पक असला पाहिजे. तुमच्या ब्रँडच्या व्हॅल्यूज या फोटोद्वारे लोकांना चटकन समजतील अशा पद्धतीचा हा फोटो असावा.. किंवा तुम्ही इथे तुमच्या व्यवसायाशी संबंधित एखादा व्हिडिओसुद्धा लावू शकता. हा व्हिडीओ 20 ते 90 सेकंदांपर्यंतचाच असावा तसंच 1080p इतक्या रेसोल्यूशनचाच असावा.
4. फेसबुक पेजचे टेम्प्लेट बदला -
फेसबुकवर विविध प्रकारच्या उद्योगव्यवसायांसाठी पेजचे त्या अनुसारे विविध टेम्प्लेट्स देण्यात आलेले आहेत त्यांचा वापर करा. उदा. स्टँडर्ड पेज, बिझनेस, व्हेन्यूज, मूव्हीज, चॅरिटी, पॉलिटीशअन्स, सर्व्हीसेस, रेस्तराँ किंवा कॅफेज, शॉपींग इत्यादी. यापैकी तुमच्या व्यवसायासाठी योग्य ते फेसबुक पेज निवडा.
5. फेसबुक पेजचे नाव ठरवा -
तुमच्या व्यवसायाचेच नाव बरेचदा फेसबुक पेजलाही ठेवलेले अधिक सोपे आणि अधिक योग्य ठरते. यामुळे ग्राहकांना तुमच्या व्यवसायाशी, तुमच्या ब्रँडशी कनेक्ट होता येणे अधिक सुलभ होते. त्यामुळे पेजचे नाव ठरवताना शक्यतो तुमच्या व्यवसायाचेच नाव ठेवा, किंवा साधारण तुमच्या व्यवसायाशी साधर्म्य सांगणारे नाव ठेवता येईल.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
6. फोटोज आणि व्हिडीओज एड करा -
तुमच्या व्यवसायाशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ या पेजवर अपडेट करा. तसंच सातत्याने तुमच्या कामाचे नवनवीन फोटो व व्हिडीओ या पेजवर अपडेट करत रहा.
7. पेजचे रोल असिस्ट करा -
तुमच्या बरोबर जे अन्य विश्वासू कर्मचारी तुमच्या व्यवसायात तुम्हाला मदत करत असतील त्यांना या पेजशी जोडून घेता येईल. या पेजवरील निरनिराळे रोल्स जसे की एडमिनशिवाय मॉडरेटर, एडीटर, एडव्हर्टायझर, अनॅलिस्ट अशा विविध रोल्ससाठी तुम्ही तुमच्या विश्वासार्ह लोकांची नियुक्ती करू शकता.
8. कॉल फॉर एक्शन -
तुमच्या व्यवसायाशी संबंधित जाहिरात तर या पेजवर झाली पण प्रत्यक्षात जर ग्राहकाला तुमच्याकडून एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी नेमकी काय पद्धत आहे त्याचा तपशील या पेजवर स्पष्टपणे द्या. यामुळे ग्राहक थेट तुमच्या उत्पादनाची खरेदी करू शकेल. त्यासाठी तुमची वेबसाईट, किंवा बुकींग वुईथ यू, काँटॅक्ट यू, शॉप वुईथ यू ऑर मेक डोनेशन, डाऊनलोड युअर एप ऑर युअर गेम यापैकी योग्य ते पर्याय पेजवर स्पष्टपणे दिसतील अशाप्रकारे एक्टीव्हेट करून ठेवा.
9. तुमच्या फेसबुक फ्रेंड्सना इन्व्हाईट करा -
एकदा का तुमचं पेज सुरू झालं की लगेच त्या पेजवर तुमच्या फेसबुक फ्रेंड्सना इन्व्हाईट करा. यामुळे तुमच्या पेजचे फॉलोअर्स वाढतील व जास्तीत जास्त लोकांना तुमच्या व्यवसायाची माहिती होईल, तसंच ते तुमच्याशी जोडले जातील.
10. फेसबुक इनसाईट्सकडे लक्ष ठेवा-
तुमच्या फेसबुक पेजची लोकप्रियता दिवसागणिक वाढतीये की कमी होतीये, किती लोक तुमच्या पेजवर रोज व्हिजीट करत आहेत वा किती लोक तुमच्या पेजवरून कमी झाले अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचे अपडेट्स तुम्हाला फेसबुक इनसाईट्सकडून मिळत असतात. त्यामुळे दररोज हे इनसाईट्स चेक करत चला. व त्या आधाराने तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर आणखी काय काय नवीन केल्यास अधिक ग्राहक तुम्हाला जोडता येतील याचा विचार करा व त्यानुरूप पेजमध्ये कंटेंट क्रिएट करा. याचा फायदा निश्चितच तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला होईल.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com