There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मित्रांनो, 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लतादिदी मंगेशकर हे जग सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जग हळहळले, पण काही माणसं अशी असतात जी आपल्या कामाने या जगात सुगंध पेरून जातात. लतादिदींनी तर त्याहीपलीकडे जाऊन जगातील माणसांच्या आत्म्याला स्पर्श केला. त्यांच्या स्वरांमधील पावित्र्य, माधुर्य आणि त्यांचा अभिजात असा सूर या जगातील मर्त्य मानवासाठी दैवी साक्षात्कारच जणू ! साक्षात सरस्वती मातेचे स्मरण लतादिदींकडे पाहून होत असे.. पण मित्रांनो, केवळ तेवढ्यावरच लतादिदींना पूर्णत्व मिळत नाही, तर त्यांनी त्यांचे जीवन ज्या आदर्श पद्धतीने जगले त्यामुळे त्यांचा सूर साक्षात उजळून निघाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
म्हणूनच, ज्या आदर्श मूल्यांची शिकवण लतादिदींकडून आपण घेऊ शकतो त्याविषयी जाणून घेऊयात. स्वर्गीय लतादिदींकडून शिकण्याजोग्या काही गोष्टी -