'काय तुम्हाला कोदावरी संकल्पनेविषयी माहिती आहे का ?' परिपूर्णतेचा ध्यास धरा आणि तुमचे जीवन बदला .. (#Monday_Motivation)

मित्रांनो, जीवनात कोणतेही शॉर्टकट्स नसतात.

जर तुम्हाला महान बनायचं असेल तर ..परिपूर्णतेचा ध्यास, तपशीलाकडे दिलेले काटेकोर लक्ष आणि उत्कृष्ट कामगिरी या किमान बाबी तुमच्यात असल्या पाहिजेत.

संपूर्णपणे झोकून देऊन काम करण्याच्या अशा साधनेला, जपानी संस्कृतीमध्ये “कोदावरी”असे म्हणतात.

आपल्याकडे सहसा अधिक कार्यक्षमता, जास्त उत्पादनक्षमता आणि प्रचंड वाढ या तीन बाबींना खूप महत्वच दिले जाते. त्यातही एक असा प्रचलित विश्वास आजवर होता की जे अधिक वेगाने अधिक उत्पादनं तयार करून वितरण करू शकतात तेच या स्पर्धेत जिंकतात. पण, याविरुद्ध जर तुम्ही व्याप्ती वाढविण्या ऐवजी केवळ दर्जा उंचावण्यासाठीच अधिकाधिक प्रयत्न केलेत तर काय होईल.. ?

कोदावरी ही हीच मानसिक चौकट आहे, जी तुम्हाला हे करायला भाग पाडते, आणि याची मुळं यात दडलेली आहेत, की गुणवत्ता ही संख्येपेक्षा नेहमीच अधिक महत्त्वाची असते. कोदावरी संकल्पना सांगते की आपण नेहमीच दर्जा उंचावत काम केले पाहिजे.

या विचारधारेनुसार आचरण असलेली अनेक थोर मंडळी आहेत, जसं, स्टीव्ह जॉब्स, एलॉन मस्क, जेफ बेझोस हे सगळेजण कोदावरी संकल्पनेनुसारच काम करतात. केवळ स्पर्धेत टिकून रहाण्यासाठीच नव्हे तर एकंदरीतच आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी त्यांनी आपल्या उत्पादनांच्या दर्जाची सातत्याने वाढ करत प्रगती साधण्याचा मार्ग जीवनात अवलंबलेला आहे.

स्टीव्ह जॉब्सचे रिएलिटी डिस्टॉर्शन फील्ड हे या कोदावरी संकल्पनेचे एक जिवंत उदाहरण आहे असे म्हणता येईल. जॉब्सने लोकांना हे पटवून दिले आहे की त्यांना जेवढं वाटतं, त्यापेक्षा अधिक पटींनी ते उत्तम काम करू शकतात, आणि कोणत्याही अटींवर त्यांना तडजोड करण्याची गरज नसते.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

2006 सालची गोष्ट. आयफोनच्या स्क्रीनसाठी वापरलं जाणारं प्लास्टीक स्क्रीन चटकन तुटूफुटू शकते हे स्टीव्ह जॉब्सच्या लक्षात आलं होतं.. आणि मग त्यांनी त्याऐवजी काचच वापरली पाहिजे असा आग्रह धरला. यासंबंधी कॉर्निंग कंपनीच्या गोरिला ग्लासबद्दल माहिती कळताच, त्याचा शोध घेत तो न्यूयॉर्कला वेन्डेल वीक्स, जे तिथले सीईओ होते त्यांच्या भेटीसाठी गेला..आणि जॉब्सला जे हवं होतं ते मिळालं.

कॉर्निंगची उत्पादने त्याला हवी तशी होती मात्र ती खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादीत होत नव्हती, त्यामुळे ती वापरल्यास नंतर मागणीएवढा पुरवठा कंपनी करू शकेल की नाही याबद्दल त्याला साशंकता होती. पण तरीही, जॉब्सने या कंपनीला गोरिला ग्लासची एक मोठी ऑर्डर दिली आणि तुम्ही हे करू शकता असा विश्वासही त्याने कंपनीला दिला... अँड द रेस्ट इझ हिस्ट्री..

कॉर्निंगने उत्पादन केले आणि जॉब्सला त्याच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे प्लास्टीकला पर्याय असलेली गोरिला ग्लास मिळाली. एवढेच नव्हे तर पुढे प्रत्येक स्मार्टफोन मध्ये गोरिला ग्लास हा अत्यावश्यक भाग बनला.

मुद्दा हा की अनिश्चितता असतानाही जॉब्सने स्वतःच्या अपेक्षित गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली नाही, तर तो स्वतःच्या कंपनीच्या प्रतिष्ठेशी एकनिष्ठ राहिला. तपशीलावर लक्ष देणे, तडजोड न करणे आणि कोणतेही शॉर्टकट न वापरणे हे सूत्र त्याने अवलंबिले .. हीच तर असते कोदावरी.

कोदावरी तुम्हाला सातत्याने सुधारणा करायला लावते, कधीही समाधानी होऊ देत नाही.

ऍमेझॉनचा जेफ बेझोस एकदा म्हणाला होता, मला ग्राहकांचा एकच गुण आवडतो की ते सतत असमाधानी असतात, ग्राहकांनी एखाद्या उत्पादनाला, गोष्टीला काल जर Woww म्हटलं होतं, तर तीच गोष्ट आज पुन्हा त्यांच्या लेखी सामान्य झालेली असते.

मग हीच कोदावरी आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्याशी कशी जोडता येते .. तर, सातत्याने स्वतःला विकसीत करण्याचा ध्यास.. स्वतःकडून सातत्याने सर्वोत्तम देण्याचा ध्यास म्हणजे आपल्या वैयक्तिक पातळीवर आपण फॉलो करत असलेली कोदावरी..

रोल्स रॉयसचे कोफाऊंडर हेन्री रॉयस म्हणतात, सगळ्याच गोष्टींमध्ये परफेक्शन मिळविण्यासाठी झगडत रहा. जे जे उत्तम आहे ते घ्या आणि त्याला सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा, जर तसं काही नसेलच तर तुम्ही स्वतः तसं निर्माण करा, उत्तम आणि योग्य याच्याहून खालच्या प्रतीचं काहीही स्वीकारू नका..

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2025 Privacy policy Terms of use Contact us Refund policy