There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
प्रत्येक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं लक्ष्य असतं, ते म्हणजे, सोशल मीडियावर आपल्या पोस्ट्स तुफान शेअर व्हायला पाहिजेत. त्यासाठी जो तो खूप डोकं लावून पद्धतशीरपणे शब्दयोजना करून आपले विचार सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. निरनिराळे विषय घेऊन त्यावर लिहीत असतो. हल्लीच्या काळात तर कंटेंट मार्केटींगलाच अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, सोशल मीडियावर कंटेंट मार्केटींग करताना, सोशल मीडियासाठी खास म्हणून कंटेंट तयार करणं हे एक फार मोठं कौशल्य आहे. भल्याभल्या लेखकांनाही ते अद्याप नेमकं गवसलेलं नाही पण अनेक नवख्या आणि चाचपडणाऱ्या लेखकांनाही या माध्यमाची नस ओळखून लिहीता आलंय हे देखील तितकंच खरं.
मग नेमकं यातलं रहस्य काय आहे.. ?
नेमकं काय आणि कसं लिहीलं, तर तुमची एकूण एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होईल याचं गुपित तरी काय ?
चला तर मग आज हेच गुपित सांगणारा हा आमचा लेख, आणि जर तुम्हाला हा लेख आवडला तर आज हा लेख तुफान शेअर करायलाच हवा बरं का !
1. A+ गुणवत्तेचं कंटेंट (आशय) असा दर्जा कोणत्याही कंटेंटला केव्हा मिळतो ?
असा ए प्लस दर्जात्मक आशय तुम्ही तेव्हाच लिहू शकता जेव्हा तुमचा त्या आशयाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेलं. म्हणजे, जेव्हा तुम्ही तुमच्या पोस्ट्सकडे केवळ काहीतरी लिहायचं म्हणून लिहीलं अशा विचाराने न बघता, तुमच्या ब्रँडसाठी हाच आशय म्हणजे जणू त्या ब्रँडला जिवंत ठेवणारी रक्तवाहिनीच आहे, आणि ती नसेल तर तुमचा ब्रँड जगणारच नाही असा विचार करा. जर हा कंटेंट योग्य नसेल किंवा तितका प्रभावी नसेल, योग्य नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या ब्रँडवर होईल हे लक्षात घ्या.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
प्रभावी कंटेंट तयार करताना या बाबी लक्षात ठेवा -
1) वाचनीयता -
तुम्ही कितीही मोठा, लांबलचक मजकूर लिहा पण समजा तो वाचनीय नसेल तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. तसंच कितीही अवजड शब्द वापरून तुम्ही तो लांबलचक मजकूल लिहीला असेल तरीही त्याचा कोणताच प्रभाव वाचकांवर पडणार नाही. केवळ तुमचा शब्दसंग्रह व शब्दसंपत्ती दाखवण्यासाठी लिहीणं टाळा. तुमच्या आशयात काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे, वाचकांना क्षणार्धात तो लेख वाचून छान काहीतरी विचार मिळाला पाहिजे.
2) प्रॉब्लेम सॉल्व्हींग कंटेंट -
तुमच्या कंटेंटमुळे वाचकांच्या त्यांच्या जीवनातील एखाद्या समस्येचे उत्तर मिळाले पाहिजे. त्यांच्या जीवनात काही अडचणी असल्या, जसं, नातेसंबंधातील तणाव, करिअर मार्गदर्शन, पालकत्त्व, आरोग्य अशा कोणत्याही विषयावर तुम्ही अशा पद्धतीने काही लेखन केले ज्यातून वाचकांना काहीतरी योग्य, जीवनावश्यक असा आशय मिळेल तर आणि त्यांच्या जीवनातील संबंधित विषयांच्या अडचणी दूर होतील तर असा आशय नक्कीच जास्त प्रभावी ठरतो. जर असा कंटेंट तुम्ही तयार करू शकण्यात अयशस्वी झालात तर मग तुम्ही सोशल मीडियाच्या स्पर्धेत टिकू शकणार नाही.
3) इमेजेस, इन्फोग्राफीक्सचा वापर करा -
आशयाशी संलग्न अशा उत्तम, प्रभावी इमेजेस तयार करून त्यादेखील पोस्ट करा. स्टॉक फोटोज, कॉपीराईट फ्री इमेजेस ज्या गुगलवर विविध फोटोजच्या साईट्सवर सहज उपलब्ध आहेत त्या वापरा. इन्फोग्राफीक्स, टेबल्स, मॅप्स, चार्ट्स यांचा वापर करा. सोशल मीडिया फीडमध्ये असे व्हिज्युअल्स आणि इन्फोग्राफीक्स असलेल्या पोस्ट्स खूपच लक्षवेधी ठरतात.
मित्रांनो, कंटेंट मार्केटींगसाठी कंटेंटचे निरनिराळे घटकही तितकेच प्रभावी हवेत. हे घटक कोणते, आणि ते प्रभावी करण्यासाठी तुम्ही कोणकोणती साधनं वापरू शकता याविषयी जाणून घेऊया पुढल्या लेखात ...
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com