There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Michael Hyatt लिखीत Free to Focus हे पुस्तक आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी तसंच एकूणातच आपल्या जीवनात आपली उत्पादनक्षमता कशी वाढवता येईल याबद्दल मार्गदर्शन करते. आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात आपण एका शब्दाचा अहोरात्र फार विचार करत असतो.. हा शब्द म्हणजे 'More' .. अर्थात 'अधिक '
आपल्याला अधिक वेगाने प्रगती करायची असते, आपल्याला अधिक पैसा हवा असतो, आपल्याला अधिक पैसा खर्च करायचा असतो, आपल्याला त्यासाठी अधिक काम करायचं असतं, आपल्याला अधिक उत्तम जीवनशैली हवी असते आणि त्यासाठीच आपण अधिक कामासह अधिक रिस्क आणि अधिक ताण घेत असतो..
पण हे सगळं करताना आपण हा विचार करत नाही, की आपण कोणतंही काम हे कमी श्रमात करूनही अधिक उत्पादकता जीवनात साध्य करू शकतो. हे कसं शक्य आहे याबाबतचं मार्गदर्शन या पुस्तकात लेखकाने केलेलं आहे.
त्यासाठी त्यांनी 9 पायऱ्या दिल्या आहेत, त्यांचा विचार करून व त्यावर अंमलबजावणी करून आपण जीवनात अधिक उत्पादकतेने कार्यसिद्धी करू शकतो.
1. उत्पादकतेला गांभीर्याने घ्या -
आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्याजवळील कामं लवकर संपवू आणि कामं संपवून उरलेल्या वेळात आराम करू. पण प्रत्यक्षात असं होत नाही, कारण आपल्यावरील कामाचा बोजा सतत वाढतच असतो. हा बोजा नंतर इतका वाढत जातो की एका क्षणी आपल्यावरील ताणाचा उद्रेक होतो. यामुळे आपल्या उत्पादकतेवर थेट परिणाम होतो आणि ती एकदम कमी होऊन जाते. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की तुम्ही उत्पादकतेला किती गांभीर्याने घेता हा आहे. जर आणि जेव्हाही तुम्ही उत्पादकतेला गांभीर्याने घ्यायला लागाल तुम्ही तुमच्या कामात अधिक चोख होत जाल.
2. मन लावून काम करा -
उत्पादकता जास्त हवी असेल तर आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नीट काम करण्यावर भर द्या. त्यासाठी संपूर्ण दिवसाचं नीट नियोजन करा. दिवसाचा एक भाग ज्या वेळेत तुम्ही जास्त मनापासून काम करता असा भाग निवडा आणि त्यावेळेत जास्तीत जास्त कामं किंवा सर्वात अवघड कामं पूर्ण करून टाका.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
3. तुमच्या फावल्या वेळेचेही नियोजन करा -
अनेकांना असं वाटतं की खूप वेळ किंवा अगदी अहोरात्र काम केल्यानेच आपण आपल्यातील प्रचंड उत्पादकता सिद्ध करू शकू.. म्हणून ते केवळ काम आणि कामच करत रहातात आणि पर्यायाने नंतर ते इतके थकतात की त्यांच्यात अजिबात त्राण उरत नाही, किंवा त्यांच्या आरोग्य समस्या कालांतराने डोकं वर काढायला लागतात. म्हणूनच दिवसाचे फक्त 8 ते 9 तासच केवळ पूर्ण मन लावून काम करा आणि उरलेल्या वेळात आराम करा. चक्क झोप काढा. कारण, जर तुम्ही कामाच्या तणावामुळे पुरेशी झोप घेतली नाहीत, तर तुमच्या सातत्याने अशा वागण्याने तुमचं दुसऱ्या दिवशीचंही काम प्रभावीत होत राहील, आदल्या दिवशीपेक्षाही दुसऱ्या दिवशी तुम्ही जे काम कराल ते दिवसागणिक अधिक निकृष्ट दर्जाचे होत जाईल. अपुऱ्या झोपेमुळे तुमची क्रिएटीव्हीटीही प्रभावीत होईल आणि कामात तुमचं डोकं चालणार नाही.
5. अनावश्यक गोष्टींत वेळ वाया घालवू नका -
उत्पादकता म्हणजे अधिक काम करत रहाणे असा अर्थ नाही, तर योग्य त्या कामासाठी पूर्ण झोकून देणे तसंच अनावश्यक कामात स्वतःचा वेळ व श्रम वाया न घालवणे असा याचा अर्थ आहे. मग हे अनावश्यक गोष्टी आणि आवश्यक गोष्टी कशा ठरवायच्या.. ? तर त्यासाठी आधी तुमचं मन, तुमच्या आवडीनिवडी ओळखा, तुमचा प्राधान्यक्रम ठरवा आणि त्यानुसार स्वतःच्या वेळेचे नियोजन करा.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com