There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
दुबईचे शासक शेख हमदान बिन राशिद यांचं दुबईच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान होतं. ते संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्रीदेखील होते. दुबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक आर्थिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे.
याच शेख राशिद यांना एकदा कोणीतरी विचारलं, 'तुमच्या देशाचं भविष्य काय?'
यावर ते हजरजबाबीपणे उत्तरले, " माझे आजोबा उंटावरून सवारी करायचे. माझे वडीलही उंटावरूनच सवारी करायचे. मी मात्र मर्सिडीज चालवतो. आमची पुढची पिढी, म्हणजे माझा मुलगा तर लँड रोव्हरमधून रूबाबात फिरतो. मला ठाऊक आहे, माझा नातूही लँड रोव्हरमधूनच तेवढ्याच रूबाबात फिरेल. पण... पण माझा पणतू, दुर्दैवाने त्याला मात्र पुन्हा उंटच चालवावा लागणार आहे."
प्रश्नकर्त्याला उत्तर तर मिळालं होतं, पण त्यामागे दडलेला खोल अर्थ त्याला कळणं शक्य नव्हतं म्हणूनच त्याने प्रतिप्रश्न केला,"पण असं का .. असं का म्हणता तुम्ही .. असं का होईल..?"
तेव्हा शेख राशिद यांनी आपल्या अनुभवाची पोतडी समोरच्या व्यक्तीला उघडून दाखवली. ते म्हणाले, " तुम्हाला जीवनाची काही रहस्य मी उलगडून सांगतो. जेव्हा काळ कठीण असतो तेव्हा माणसं आपोआप त्या काळावर मात करण्यासाठी सज्ज होतात. अर्थात, कठीण काळ खंबीर माणसं घडवतो. खंबीर माणसं आपल्या गुणांनी अवघड काळातही छान तग धरून रहातात. त्यांच्या गुणांनी कठीण काळ अर्थातच सुसह्य होतो. पण जेव्हा असा सर्वदृष्टीने सुसह्य काळ येतो तेव्हा त्या काळात, त्या परिस्थितीत माणसं मात्र दुबळी होतात.याचं कारण, त्यांच्यासमोर कोणतंच आव्हान नसतं.. आणि म्हणूनच त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापरही ते करत नाहीत. यामुळेच सुसह्य काळात (उत्तम परिस्थितीत) माणसं मात्र दुबळी होतात. हीच दुबळी माणसं पुन्हा कठीण काळ जन्माला घालतात...
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
अर्थात, दुबळ्या माणसांना ना त्यांच्या क्षमतांचा अंदाज असतो, ना त्यांच्या क्षमता ते पुरेपूर वापरतात. त्यांच्याजवळ परिस्थितीने व त्यांच्या पूर्वजांनी श्रम करून मिळवलेल्या अनेक गोष्टी सहज उपलब्ध असतात, ज्यांचा ते पुरेपूर वापर करतात, उपभोग घेतात.. आणि त्यातच त्यांच्या जीवनाचा बराच कालावधी निघून जातो. मग जेव्हा हातून वेळ निघून जाते तेव्हा आपोआपच त्यांच्या क्षमता विकसीत झालेल्या नसतात आणि म्हणूनच त्यांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो.
हे चक्र अव्याहतपणे सुरू रहाते. अनेकांना हे समजतच नाही त्यामुळे ते परिस्थिती व कालौघात पुढे पुढे जात रहातात.. पण माणसाने हेच लक्षात घेतले पाहिजे की जीवन ही एक युद्धभूमी आहे आणि तुम्ही त्या भूमीवर लढणारे योद्धे म्हणून जगलं पाहिजे.. परंतु, अनेकांना या गोष्टीचा विसर पडतो आणि ते स्वतःला इतरांवर अवलंबून ठेवत परजीवी म्हणून आयुष्य जगतात आणि तसेच मरतात !"
आपल्या अपत्यांवर, पुढल्या पिढ्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून आपण या जीवनसंग्रामाशी दोन हात करतील असे धडाडीचे 'योद्धे' घडवायला हवेत, ना की 'परजीवी' !
मित्रांनो, तुम्ही स्वतःला आणि आपल्या मुलांना कसं मोठं करताय .. ?
जीवनसंग्रामातील 'योद्धा' म्हणून की 'परजीवी' म्हणून .. ?
विचार करा .. आणि आजच स्वतःला बदला..
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com