वाचन करा, सातत्याने शिकत रहा .. त्यानेच मिळेल यश (#Saturday_Bookclub)

जगातील सर्वात यशस्वी लोकांची एक कॉमन सवय असते ती म्हणजे वाचन करणे. वॉरेन बफे त्यांचा 80 टक्के वेळ वाचन करण्यात घालवतात आणि बिल गेट्स दरवर्षी फक्त वाचन करण्यासाठी दोन आठवड्यांची सुट्टी घेतात.

कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात स्मार्ट आणि सर्वात व्यस्त माणसं दररोज दिवसातला 1 तास वाचनासाठी आवर्जून का काढत असतील ? आणि सामान्य माणसं वाचन करायला वेळ नाही अशी सबब देत असतात कायमच..

जगातील सर्वात श्रीमंत, यशस्वी माणसांना वाचन करण्याच्या सवयीत असं काय सापडतं जे इतर सामान्य माणसांना त्यातून सापडत नाही ? कधी विचार केलाय का ?

याचं उत्तर फार सोपं आहे.. शिकणं, आणि ज्ञानवृद्धी करणं ही आपल्या वेळेची सर्वात मोठी उत्तम गुंतवणूक आहे. बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात त्यानुसार, ज्ञान मिळविण्यासाठी केलेली गुंतवणूक सर्वात उत्तम आणि सर्वाधिक परतावा देते.

जाणीवपूर्वक शिक्षण घेणे हे ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाचं आहे, हे या यशस्वी लोकांना पक्क ठाऊक झालेलं असतं. जेव्हा तुम्हाला ज्ञानाची किंमत कळते तेव्हा तुम्ही ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न करायला लागता आणि ज्ञानवृद्धी करणं हे वाचनाच्या सवयीने सहजसुलभ होतं. तुम्हाला फक्त सातत्याने वाचन करायचं असतं आणि तुमच्या ज्ञानात भर पडणार असते.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

The 5 Hour Rule -

आठवड्यातून 5 तास किंवा दर दिवशी 1 तास इतका वेळ वाचनासाठी तुम्ही जाणीवपूर्वक दिला पाहिजे. शांतपणे एका ठिकाणी बसून जेव्हा तुम्ही वाचनावर लक्ष्य केंद्रीत करून मनापासून वाचन कराल तेव्हा तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल आणि तुम्ही ज्ञान मिळवाल, नवं काहीतरी शिकाल.

शिकणं आणि काम करणं यात गल्लत करू नका -

शिकणं आणि काम करणं यात अनेकजण गल्लत करतात आणि अखेरीस वैतागून जातात. तुम्हाला असं वाटू शकतं की दर आठवड्याला 40 तास काम करणं हे तुमच्यासाठी पुरेसं असू शकतं आणि त्यामुळे निश्चितच तुम्ही प्रगती करत आहात असंही तुम्हाला वाटेल मात्र, तसं फार क्वचितच कोणाच्या बाबतीत घडू शकतं. जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवनातील समस्यांमध्येच अडकून पडता तेव्हा तुम्ही स्वतःला विकसीत होण्यासाठी आणि स्वतःची वाढ होण्यासाठी वेळच देऊ शकत नाही. म्हणूनच, 5 तासांचा रूल जीवनात पाळलात तर तुम्ही पूर्णपणे शिकण्यावरच लक्ष्य देऊन नवं काहीतरी शिकाल, नवं काहीतरी समजून घ्याल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही रोज कामावर जाता आणि तिथेच तुम्ही शिकता तर तसं होत नाही. शिक्षण घेण्यासाठी व ज्ञान मिळवण्यासाठी निश्चित उद्दीष्ट ठरवावं लागतं आणि ते साध्य करण्यासाठी वेळ काढावा लागतो आणि त्यानंतरच तुम्ही स्वतःतील बदल अनुभवू शकता.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy