There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
ॲलेक्स नावाचा चार वर्षाचा मुलगा एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता. सुरुवातीला त्याच्या दातांमध्ये प्रचंड वेदना व्हायच्या. आईला वाटलं, मुलाला दात येण्याच्या प्रोसेस मध्ये काही त्रास असेल म्हणून दातांच्या डॉक्टरकडे गेले. पण काही उपाय एका आईने आपल्या लहान बाळाच्या दुर्मिळ आजाराचा निदान ChatGPT च्या मदतीने केलं.
ॲलेक्स ला प्रचंड वेदना होत होत्या आणि 17 डॉक्टर व तीन वर्ष घालवल्यानंतरही त्याला उपाय सापडणे तर दूरच , त्याला नेमका त्रास कसला आहे तेच कळत नव्हतं.
शेवटी त्रस्त होऊन त्याच्या आईने एकदा ChatGPT ला मुलाच्या आजाराबद्दल विचारलं. तिने त्याचे सर्व रिपोर्ट्स शक्य तितक्या सविस्तर लिहिले, एवढेच नव्हे तर पूर्ण केस हिस्ट्री सविस्तर सांगितली. त्यावर ChatGPT ने निदान केले की हा Tetherd Cord Syndrome टेथर्ड कॉर्ड सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ आजार असू शकेल.
हा आजार न्यूरोलॉजी शी संबंधित असल्याचे कळल्यावर एलेक्सा आईने त्याबद्दल सर्च करायला सुरुवात केली. या रोगाने बाधित लोकांचा एक फेसबुक ग्रुप तिला सापडला आणि त्यावर चर्चा केल्यानंतर आपल्या मुलाला झालेला आजार हा चॅट जीपीटीने सांगितलेला टेथर्ड कॉर्ड सिंड्रोम हाच आजार असल्याचे तिला पटले.
त्यानंतर न्यूरोसर्जन कडे जाऊन तिने याची खात्री करून घेतली आणि ॲलेक्सचे गेल्या महिन्यामध्ये ऑपरेशन देखील झाले.आता अलेक्सचे दुखणे बरे झाले आहे आणि तो या आजारातून बरा होत आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच आमचे व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करा.
https://whatsapp.com/channel/0029Va5x3ZxCHDyhcUFdJG2v
================
मंडळी, कितीही झालं तरी डॉक्टर माणूस आहे आणि एकाच माणसाला सर्व ज्ञान असणे अशक्य आहे. पण AI ला मात्र ही मर्यादा नाही. एक वाक्य नीट लक्षात ठेवा "तुम्ही ज्या गुणवत्तेचे प्रश्न विचाराल, तेच प्रश्न तुमच्या आयुष्याची गुणवत्ता यापुढे ठरवणार आहेत".
मग मला सांगा तुम्हाला AI ला कोणता प्रश्न विचारायचा आहे? कसा विचारायचा हे शिकण्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा -
https://youtu.be/zYIVjDFmYLE?si=XT8tNQpWrNurG3LX
हा व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका !
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !