8 अशा वेबसाईट्स ज्यावरून तुम्हाला मिळेल मोफत स्टॉक व्हिडीओ फूटेज 

#Web_Wednesday

वैयक्तिक व व्यावसायिक वापराकरिताही उपयुक्त एखादा विषय तुमच्या डोक्यात घोळत असतो. तुम्हाला वाटत असतं की या अमक्या विषयावर एखादा मस्त व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला तर तो निश्चितच सगळ्यांना आवडेल आणि लोकोपयोगीही ठरेल .. वगैरे विचार तुमच्या डोक्यात असतात. मात्र, बरेचदा असं होतं की तुमच्याकडे त्याचं शूटींग करण्यासाठी कधी तंत्रज्ञान नसतं, कधी वेळ नसतो नि कधी पैसाही नसतो. अशावेळी तुम्हाला गुगलवरील आठ अशा वेबसाईट्स फार उपयोगी पडू शकतात ज्यावर रॉयल्टी फ्री स्टॉक 4के एचडी व्हिडीओ फूटेज उपलब्ध आहेत आणि जे तुम्ही वापरू शकता.

1. Dareful (https://dareful.com/about-dareful-completely-free-4k-stock-video/)
या वेबसाईटवर तुम्हाला अनेक विषयांवरील व्हिडीओ फूटेजचा स्टॉक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जोएल हॉलंड याचे संस्थापक असून या वेबसाईटने दर्जा आणि गुणवत्तेला प्राधान्य दिलेले आहे. यावर विशेषकरून तुम्हाला लँडस्केप क्लिप्स सापडतील. यावरील व्हिडीओ हे 100 टक्के फ्री असून तुम्ही हवे ते व्हिडीओ डाऊनलोड करू शकता आणि त्याचा व्यावसायिक वापरही करू शकता. पूर्वी याच वेबसाईटचं नाव StockFootageforFree.com होतं.

2. Mixkit ( https://mixkit.co/)
निसर्ग, तंत्रज्ञान, लोकं या विषयांबरोबरच या वेबसाईटवर तुम्हाला ड्रोनने शूट केलेले व्हिडीओजही मिळतील. अनेकवेळा असे आकाशातून घेतलेले शॉट हवे असतात पण आपल्याजवळ ते शूट करण्यासाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान नसतं त्यामुळे आपला कंटेंट किंवा आपला हेतू अपूर्ण रहातो असे वाटते. अशावेळी तुम्हाला फ्री स्टॉक व्हिडीओ फूटेज देणारी ही वेबसाईट आहेत. यावर अनेकविध विषयांवरील व्हीडीओ फूटेज आहे. त्याचबरोबर व्हिडीओसाठी आवश्यक असलेलं संगीत, विविध साऊंड इफेक्ट्स आणि अन्य अनेक महत्त्वाचे फूटेजही या वेबसाईटवर तुम्हाला सापडेल ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या व्हीडीओसाठी करू शकता.

3. splitshir (https://www.splitshire.com/)
या वेबसाईटवर तुम्हाला स्टॉक फोटोजसह स्टॉक व्हिडीओजही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. वेब डिझायनर डॅनिअल नॅनेस्क्यू यांनी ही वेबसाईट तयार केली. दहा वर्षांच्या त्यांच्या प्रवासात त्यांच्याकडे व्हीडीओ आणि फोटोजचा प्रचंड साठा तयार झाला होता. म्हणूनच त्यांनी तो लोकांना या वेबसाईटच्या माध्यमातून खुला करून दिला.. तोही मोफत. 2014 पासून सुरू झालेल्या या वेबसाईटवरून आजवर लाखो फोटोज आणि व्हीडीओज असंख्य वेळा डाऊनलोड करण्यात आलेले आहेत.. जे अनेक मासिकांमध्ये, म्यूझिक अल्बम्समध्ये वगैरे वापरले गेले आहेत.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

4. Coverr (https://coverr.co/)
2015 मध्ये सुरू झालेल्या या वेबसाईटवर हाय क्वालिटी व्हीडीओज मोफत देण्यात आलेले आहेत जे आजवर तब्बल 5 दशलक्ष वेळा डाऊनलोड झालेले आहेत आणि तब्बल 1.1 दशलक्ष वेळा दरमहा पाहिले गेल्याची माहिती वेबसाईटने दिलेली आहे. बी-रोल फूटेज म्हणून वापरता येण्याजोगे हे व्हिडीओज आहेत.

5. Vidsplay (https://www.vidsplay.com/ )
https://www.vidsplay.com/ ही वेबसाईट सॅमी फॉन्टनेझ यानी 2010 मध्ये सुरू केली. ते एक फ्रीलान्स वेब डेव्हलपर आणि डिजिटल व्हीडीओ सिनेमॅटोग्राफर असून त्यांच्या या वेबसाईटवरील अनेक व्हिडीओ स्टॉक हे MP4 फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक स्टॉक व्हिडीओजचे रिझोल्यूशन, फ्रेम रेट, ड्यूरेशन ही सगळी माहिती यावर व्यवस्थित देण्यात आलेली आहे. शिवाय, तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर अकाऊंट क्रिएट करण्याचीही गरज नाही. त्याखेरीजही तुम्ही येथून व्हीडीओ डाऊनलोड करू शकता.

6. pixabay (https://pixabay.com/)
या वेबसाईटचा वापर सर्वाधिक केला जातो तो फ्री फोटोजसाठी. मात्र, या वेबसाईटवर तुम्हाला व्हीडीओ फूटेजही उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि ते ही मोफत ..

7. mazwai (https://mazwai.com/)
यूट्यूब आणि अन्यत्र शेअर करण्यासाठी तुमच्या व्हिडीओजमध्ये जर आणखी काही फूटेज तुम्हाला जोडायचं असेल, तर तुम्ही ही वेबसाईट वापरू शकता. त्याचबरोबर एरवीही तुम्हाला व्हिडीओ फूटेज हवं असेल तर तुम्ही ही वेबसाईट वापरू शकता. जगभरातील आर्टीस्ट्सचं नेटवर्क या माध्यमातून उभारणे हा यांचा हेतू आहे. या वेबसाईटवर तुम्हाला साईनअप करायची गरज नाही, तुम्ही केवळ त्यांचं लायसन्स घेऊन त्यांच्या वेबसाईटचा वापर मोफत करू शकता.

8. Pexels (https://www.pexels.com/videos/ )
जगभरातील कमर्शियल आर्टीस्ट्सच्या नेटवर्कमधून ही वेबसाईट सुरू आहे. त्यामुळे यावर तुम्हाला अत्यंत चांगले व्हीडीओ मिळू शकतात. यावरील व्हीडीओ हे मोफत असून ते तुम्हाला वैयक्तिक व व्यावसायिक दोन्हीही वापरासाठी देण्यात आलेले आहेत.


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy