7 अशा परिस्थिती जिथे तुम्ही शांत राहिलं पाहिजे..

कोणती परिस्थिती कशी हाताळायची हे नेहमी चटकन लक्षात आलं पाहिजे. जर तेच कळलं नाही, तर आपण अनेकदा परिस्थिती चिघळवण्यासाठी जाणतेअजाणतेपणी जबाबदार ठरतो. बरेचदा, परिस्थिती नियंत्रणात ठेवायची असेल तर आपल्याला तारतम्य राखून मौन बाळगणं आणि शांत रहाणं जमायला लागतं. त्यामुळे कोणतीही परिस्थिती ही हाताबाहेर जात नाही. 

जाणून घेऊया अशा 7 परिस्थिती ज्यात तुम्ही शांत रहायला पाहिजे - 

1. जेव्हा तुमच्या शब्दांनी समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते असं तुम्हाला वाटतं. 

2. जेव्हा तुमचे शब्द दुसऱ्याची प्रतिमा खराब करू शकतात. 

3. जेव्हा तुम्हाला खूप राग आलेला असतो. 

4. जेव्हा तुमच्यावर टीका केली जात असते. 

5. जेव्हा तुमच्या शब्दांनी मैत्री तुटणार असते. 

6. जेव्हा तुम्हाला पूर्ण तथ्य माहिती नसते. 

7. जेव्हा तुम्ही ओरडायला लागणार असता .. तेव्हाही शांत रहा..