वेगाने बदलणार्‍या जगात टीकण्यासाठी लागणारी 

६ गरजेची कौशल्ये

आजचे जग हे वेगाने बदलणारे जग आहे. जागतिकीकरण, बदलते तंत्रज्ञान, बदलती अर्थव्यवस्था आणि बदलणारे जॉब मार्केट अशा अनेक बदलांना आजची पिढी सतत सामोरी जात आहे. या वेगवान बदलांमुळे निराशा येणे आणि सर्व काही डोक्यावरुन जात आहे अशी भावना निर्माण होणे स्वाभाविकच आहे. पण या सर्वांचा फक्त विचारच करत बसण्याची ही वेळ नाही. ही वेळ आहे या वेगाबरोबर वेगवान होण्याची, ही वेळ आहे हे बदल स्विकारण्यासाठी आणि आपली भरभराट करण्यासाठी कृती करण्याची. आज आपण अशीच ६ कौशल्य पाहणार आहोत जी आपल्याला या वेगाने बदलणार्‍या जगात अगदी शांततेत यशस्वी होण्यासाठी मदत करतील.

१. संवाद साधण्याचे कौशल्य शिका.

फक्त सेल्सपर्सन होण्यासाठीच संवाद कौशल्य गरजेचे असते असे नाही, पण संवाद कौशल्य चांगल असेल तर तुम्हाला कंपनीच्या काही निर्णायक रणनिती जाणून घेण्यासाठी सुध्दा याची मदत होईल. आजच्या ऑफर केल्या जाणार्‍या नोकरीच्या संधी बघून तुम्हाला हा अंदाज आलाच असेल की आता आणि भविष्यात सुध्दा नोकरी देताना कंपनी त्यांच्या आवश्यक कौशल्यांच्या यादीत संवाद कौशल्याचा उल्लेख करतात आणि यापुढेही करत राहतील.

मोठमोठ्या कंपन्या तुमची लिहण्याची क्षमता आणि तुम्ही किती हुशारीने बोलताय, किती स्वच्छ आणि परिणामकारक संवाद साधताय यावरुन तुमचे तेथिल स्थान ठरवतात. हे कौशल्य तुमच्या करिअर ला स्थिर करण्यासाठी मदत करणारे आहे.

२. मजबूत आणि अभेद्य स्वभाव विकसित करा.

आपण सर्व इथून पुढे वेगाने बदणार्‍या या जगाचा एक भाग आहोत. एकाच कंपनीमध्ये वर्षानुवर्षे काम करण्याचे दिवस आता गेले. कंपनीकडून मिळणारी पेन्शन आता हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. या जगात तुम्हाला फक्त स्वतःवर अवलंबून  रहायच आहे आणि स्वतःच स्वतःचा मार्ग बनवायचा आहे.

सर्व क्षेत्र एकमेकाला अशा प्रकारे जोडू लागली आहेत की तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या करिअर्स मधून जावे लागेल. त्यामूळे नोकर्‍या बदलाव्या लागतील त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. जर तुम्ही बदलांना घाबरलात आणि स्विकारण्यासाठी जास्त वेळ घेतलात तर तो पर्यंत त्यामध्ये अजून इतके बदल निर्माण झाले असतील की ते गाठणे कठीण होऊन जाईल. तुम्हाल स्वतःला प्रत्येक परिस्थितीमध्ये मजबूत आणि न घाबरता टिकून राहण्यासाठी शिकवावं लागेल.

३. ज्ञानासाठी भुकेलेल्याप्रमाणे वाचा आणि सतत शिकत रहा.

आपल्यातले खुप लोकं कॉलेज संपलं की शिकणे सोडून देतात. हे असं  आहे जसं आपल्या एखाद्या मित्राला जूनी गाणी आवडतात म्हणून तो तीच ऐकतो नवीन काय आलय ते कसं आहे हे बघतच नाही आणि त्या काळातच अडकून जातो.

आजच जग हे स्पर्धांच जग आहे. या स्पर्धात्मक युगात जर टिकून रहायच असेल तर तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात होणार्‍या बदलांबद्दल सतत स्वतःला विकसित करत रहावं लागेल आणि तुमच्या क्षेत्रावर परिणाम करणार्‍या नवीन ट्रेन्ड चा तुमच्या क्षेत्रावर काय परिणाम होत आहे याबद्दल सतत जाणून घेत रहीलं पाहिजे. तुम्ही सतत शिकत राहिलात तर नेहमी अशा गर्दीच्या पुढे रहाल ज्यांनी डीग्री मिळवल्यावर शिकणं सोडलं आहे.

४. आपल्या पैशांची बचत आणि गुंतवणूक करायला शिका.

असा काळ सुध्दा येऊ शकतो जेव्हा तुम्ही नोकरी किंवा बिझनेस मध्ये पहिल्यापेक्षा कमी पैसे कमवाल किंवा मिळतील. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. खुप जणं इथेच चुकतात ते त्यांच्या कमाई पेक्षा जास्त खर्च करतात. असे समजून की त्यांची कमाई चा आलेख कायम स्थिर राहणार आहे ते जर १०रु. कमवत असतील तर ३०रु. खर्च करतात आणि तसे न झाल्यास खर्च भागवण्यासाठी कर्ज घेतात आणि मग आयुष्य अस्थिर होऊन जाते.

आपण जे काही कमवतो त्यातील जितके आपल्याने शक्य आहे तितके आपण वाचवले आणि गुंतवले पाहीजेत. कठीण काळासाठी पैसे बाजूला काढून ठेवणे तुमच्या आयुष्यात खुप मोठा फरक आणू शकतं. जस जशी ही गुंतवणूक वाढत जाईल तुमच्यासाठी कमाईचा दूसरा मार्ग खुला होईल. तुमची बचत तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नोकरी निवडण्याचे, सोडण्याचे किंवा नवीन काहीतरी सुरु करण्याचे स्वातंत्र्य मिळवुन देईल. याऊलट जर तुमच्याकडे काहीच बचत नसेत तर पैशाच्या कमतरते मूळे जी आणि जशी नोकरी मिळेल ती करणे तुम्हाला भाग पडेल.

५. राजकारण आणि नको असलेल्या भांडणांपासून दूर रहा.


या सोशल मिडीयाच्या युगामध्ये आपण आपला खुप वेळ ट्वीटर आणि फेसबूकवर अनोळखी माणसांशी नको त्या मुद्द्यांवर भांडण्यात घालवतो. या भांडणांमध्ये कोणीही समजूतदार पणा दाखवत नाही. जो तो आपण कसे योग्य आहोत हे पटवून देण्यात लागलेला असतो.

अशा प्रकारे सोशल मिडीया वर भांडणे किंवा फक्त वाचणे किंवा काहीच न करता फक्त लाईव्ह भांडण्यासाठी आलेल्या लोकांना बघत राहणे आणि कोण योग्य आहे याचे अंदाच बांधत राहणे फक्त वेळेचा अपव्यय आहे दूसरे काही नाही. तुमचे पूर्ण लक्ष तुमची वेळ आणि प्रयत्न योग्य ठिकाणी लावून काहीतरी मिळवण्यासाठी लावल पाहीजे.

६. बदलांना जवळ करा.

आपण ज्याप्रकारे बाहेर आलेल्या लाटांना आतमध्ये जाण्यापासून थांबवू शकत नाही त्याचप्रमाणे आपण बदलांना थांबवू शकत नाही. गोष्टी बदतील आणि तुम्हाला त्या स्विकारता आणि प्रवाहाबरोबर जाता आले पाहीजे. बदलांना घाबरण्यापेक्षा किंवा नवीन सत्याकडे दूर्लक्ष करण्यापेक्षा आपण हा विचार करायला पाहीजे की या बदलांचा मी फायदा कसा करुन घेऊ शकतो.

लक्षात ठेवा जर तुम्ही बदलांसाठी स्वतःला खुले ठेवले तर प्रत्येक बदल तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल.

तुमच्याबरोबर असे झालेय का की तुम्ही खुप वाईट परिस्थितीतून गेलात पण त्यामूळे तुम्ही पहील्यापेक्षा योग्य ठिकाणी जाऊन पोहोचला आहात?  हे नेहमी होते. संधी नेहमी आपल्या आजूबाजूलाच असतात आपल्याला फक्त त्यांच्यासाठी तयार असायला हवे म्हणजे आपण यशस्वी होऊ शकू.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com