बिझनेसच्या यशातील ६ अडथळे

उद्योजक असणारा प्रत्येक जण आपल्या बिझनेस च्या योग्य बांधणीसाठी आणि वाढीसाठी उत्साहीत असतो. पण एक उद्योजक म्हणून तुम्हाला तुमच्या बिझनेस च्या यशाला किंवा अपयशाला कारणीभूत ठरणार्‍या गोष्टींबद्दल माहीती आहे का?

अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच काही लोक असतील जे बिझनेस मध्ये सहज यशस्वी होतात पण त्यांच्या तुलनेत असे खुप लोक आहेत ज्यांच्या बिझनेस मध्ये यश खुप वेळाने, अनेक संघर्ष आणि अपयशानंतर येते. तथापि कोणताही बिझनेस हा परिपूर्ण नाही. प्रत्येक बिझनेस मध्ये चढ उतार येतच असतात आणि प्रत्येक बिझनेस ला टिकण्यासाठी काही ना काही संघर्ष करावाच लागतो. पण जर आपल्याला बिझनेस मध्ये येणार्‍या अडथळ्यांची आणि वाढीसाठीच्या कारणांची माहीती असेल तर त्याप्रमाणे प्लॅनिंग करुन बिझ जाणून घेणार आहोत.

१. एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष देणे.

बिझनेसचे मालक, स्टार्ट अप चे मालक किंवा उद्योजक म्हणून आपण एक सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे एकाच वेळी अनेक कल्पनांकडे लक्ष देणे. एकाच वेळेला अनेक कल्पनांकडे लक्ष दिल्याने प्रत्येकी एका कल्पनेला दिला जाणाला महत्त्वाचा वेळ अनेक कल्पनांमध्ये वाटला जातो. पण जर तुम्हाला बिझनेस मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला या सर्व कल्पनांमधून एकच अशी कल्पना शोधून काढायची आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल.आणि मग तुमची पूर्ण ऊर्जा, शक्ती त्या एकाच कल्पनेवर काम करण्यासाठी लावा. तुम्हाला एकाच कल्पनेवर लक्षपूर्वक काम करायचे आहे आणि इतर कल्पनांमूळे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.

२. अंतर्गत कम्युनिकेशन चा आभाव.

आपल्या टीमच्या सदस्यांबरोबर कम्युनिकेशन चा आभाव सुध्दा बिझनेच च्या अपयशाला कारण ठरु शकते. जर तुम्ही ठरवलेल्या मिशन बद्दल किंवा स्ट्रॅटेजिस बद्दल तुमच्या टीम च्या सदस्यांना काही माहीतीच नसेल तर ते पूर्णत्वाला नेण्यासाठी ते तुमच्या प्रमाणेच सारखे प्रयत्न करु शकणार नाहीत. आणि बिझनेस च्या वाढीसाठी तुमच्याबरोबरच तुमच्या टीमच्या सदस्यांनी समान ध्येयाकडे काम करणे फार महत्त्वाचे आहे.

३. टार्गेट ऑडीयन्स

कल्पना करा की तुम्हाला तुमचे उत्पादन किंवा सेवा कोणाला विकायचे हेच माहीत नाही? जर अ‍ॅपल ने आपल्या उत्पादनाची जाहीरत फक्त ६० वर्षे आणि त्या वरील वयोगटासाठी केली असती, तर काय झाले असते?शक्यता आहे की अ‍ॅपल इतका यशस्वी झालाच नसता. जर तुम्हाला तुमचे ग्राहक कोण आहेत हेच माहीत नसेल किंवा तुम्ही याचा विचारच केला नसेल तर तुमच्या उत्पादनाला कार्यक्षमतेने मार्केट करणे आणि परिणामी विक्री करणे फार कठीण होऊन बसेल. जर तुम्हाला तुमचा बिझनेस प्रगतीच्या मार्गावर आहे याची खात्री करुन घ्यायची असेल तर तुम्हाला आणि तुमच्या टीमला तुमचे ग्राहक कोण आहेत हे माहीत असलंच पाहीजे.

४. अकार्यक्षम सेवा किंवा उत्पादन.

बिझनेस म्हणून तुम्ही तुमच्या निश्वित ग्राहकांना काय देताय ते खुप महत्त्वाचे आहे. तुमचा बिझनेस त्यांना काय पुरवतोय? हे उत्पादन आहे का? की ही सेवा आहे? खरच अशी माणसं आहेत का ज्यांना तुमच्या उत्पादन किंवा सेवेची गरज आहे? त्यांना का गरज आहे? तुम्ही तुमच्या उत्पदना किंवा सेवे मार्फत त्यांच्या समस्या सोडवत आहात का?

जेव्हा तुम्ही एखादे उत्पादन किंवा सेवा बाजारात आणायचा विचार करता तेव्हा असे अनेक प्रश्न स्वतःला विचारा. अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची कार्यक्षमता. जर तुमचे उत्पादन उपयुक्त आणि बाजारात मागणी असलेलं नसेल तर जास्त काळ बिझनेस मध्ये टीकून राहणे कठीण आहे.

५. चूकांकडे दूर्लक्ष

अनेक बिझनेस ते नेमके कुठे चूकले आहेत हे न अभ्यासल्या मुळे बंद होतात. चूकीचे उत्पादन, अकर्यक्षम मार्केटिंग प्लान किंवा चूकीच्या ग्राहकांची निवड अशी अनेक कारणे बिझनेस मंद करु शकतात. पण जे प्रत्यक्षात एखाद्या बिझनेस ला संपुष्टात आणते ते म्हणजे चूकांकडे दूर्लक्ष. आपल्या बिझनेसवर परिणाम करणार्‍या प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाणीव असली पाहिजे.

तुमच्या नवीन सेल्स स्ट्रॅटेजी मुळे तुमच्या बिझनेस वर काय फरक पडला आहे? हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. कुणी तुमच्या वेबसाईट वरती वाईट फिडबॅक दिला आहे का? त्या फीडबॅक मुळे तुमच्या ग्राहकांवर परिणाम झाला आहे का? तुमची रेफरल टीम कसे काम करत आहे? अशा अनेक गोष्टींबद्दल तुम्ही सतत जागृक राहीले पाहिजे. आपल्या बिझनेस च्या बारिक बारिक गोष्टींबद्दल सतत स्वतःला अपडेट करत रहा.

६. अपूर्ण मार्केटिंग प्लान


शेवटची पण महत्त्वाची गोष्ट तुमचा मार्केटिंग प्लान अतिशय योग्य आहे याची खात्री करुन घ्या. तुमचा मार्केटिंग प्लान किंवा मार्केटिंग कॅम्पेन मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन त्याचा नक्की उद्देश्य काय आहे, त्याची प्रक्रीया कशाप्रकारे चालणार आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्ही कशा प्रकारे ट्रॅक करणार आहात ते प्रथम समजून घ्या. गुगल अ‍ॅनालिटीक्स किंवा इनसाईट्स सारख्या टूल्स वापरुन तुमचा कॅम्पेन कशाप्रकारे काम करत आहे ते जाणून घ्या.


================
आपल्या व्यवसायात गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा आणि उद्योजकाला सतत मार्गदर्शन करणारा योग्य "बिझनेस प्लान" कसा तयार करावा ?हे नेटभेटच्या "बिझनेस प्लान कसा तयार करावा?" या ऑनलाईन कोर्स मधून शिका.
https://learn.netbhet.com/s/store/courses/description/How-to-Create-Business-Plan-
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy