5 अशा गोष्टी ज्यामुळे तुम्ही व्हाल अधिक चांगली व्यक्ती

चांगली व्यक्ती म्हणून ओळख कमवायची असेल तर आपल्याला अनेक लहानसहान गोष्टींवरही लक्ष्य द्यावं लागतं. स्वतःच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण जाणीवपूर्वक करावी लागते. त्यासाठी कधी चांगले गुरू हवेत, कधी चांगले मित्र हवेत तसंच चांगलं वाचनही हवंच. मात्र, अशा काही गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या व्यक्तीमत्त्वात जाणीवपूर्वक रूजवू शकलात तर निश्चितच तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये त्याची भरच पडेल आणि तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा योग्य प्रभाव इतरांवर पाडू शकाल. त्यासाठी हे करा -  

1. मन जाणून घेण्यासाठी ऐका, प्रतिउत्तर देण्यासाठी नाही.

2. दिखाव्यासाठी नव्हे तर मनापासून काळजी घ्या

3. अहंकारापोटी नव्हे तर मनापासून बोला.

4. स्वतःच्या चुका मान्य करा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा.

5. राग आला तरी संयम ठेवा आणि दुसऱ्यांना शब्दांनी दुखावू नका.