There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
असं म्हणतात तुम्ही एकवेळ एखादे काम करताना उशीर करु शकता. पण वेळ तस करत नाही आणि एकदा गेलेली वेळ परत सुध्दा येत नाही. तरीही अशी खुप माणसं आहेत जे अजूनही कामाची चालढकल करण्याच्या आपल्या सवयीपासून सुटका करुन घेण्यासाठी धडपडत आहेत. आपला वेळ योग्य प्रकारे वापरण्यासाठी काय करावे ? असा प्रश्न अनेकांना पडतो. आणि याच उत्तर शोधताना तुम्हाला खुप वेळा असं ऐकायला मिळालंच असेल की आपल्या कामाची सुरुवात कठीण कामाने करावी. आपल्याला मिळणारा हा सल्ला बरोबर आहे का ?आणि कठीण कामाने सुरुवात केल्याने असा काय फरक पडू शकतो? याचीच ५ कारणं आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
१. आपली ऊर्जा हुशारीने वापरण्यास मदत होते.
जितकं काम कठीण असत तितकीच जास्त ऊर्जा आणि लक्ष ते काम पूर्ण करण्यासाठी लागतं. आणि हेच महत्त्वाचं कारण आहे की कठीण कामे सुरुवातीला करावी. दिवसाच्या सुरुवातीला जेव्हा कामाला सुरुवात झालेली नसते तेव्हा आपली ऊर्जा आणि लक्षकेंद्रीत करण्याची क्षमता जास्त असते. त्यावेळी कठीण काम केले तर ते सहज शक्य होते. पण याउलट दिवस संपती संपता ही ऊर्जा आणि लक्षकेंद्रीत करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. आणि मग दिवसाच्या शेवटी थकव्यामुळे आपण कठीण काम करणे टाळतो आणि ते काम दूसर्यादिवसावर ढकलले जाते.
२. चालढकल कमी करण्यासाठी.
माणसं कामाची चालढकल जास्तप्रमाणात तेव्हाच करतात जेव्हा त्यांना एखादं काम कठीण वाटतं. त्यामुळे दिवसाची सुरुवातच जर कठीण कामाने झाली तर आपण कामाची चालढकल करण्याची ही सवय कमी करु शकतो शिवाय ही सवय तुम्हाला जास्त उत्पादनक्षम होण्यास मदत करेल.
३. पुढील कामे चांगली आणि उत्साहात करण्यासाठी मदत करते.
कठीण काम सुरुवातीला केल्याने त्यानंतरची कामं तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे आणि उत्साहात पार पाडू शकता. कठीण काम ठेवून आपण सोपी कामं जेव्हा प्रथम करतो तेव्हा सोपी कामं करताना सुध्दा नंतरच्या कठीण कामाचा तणाव आपल्यावर असतो पण जर आपण कठीण आणि महत्त्वाचे काम पहीले केले तर हा तणाव त्या कामाबरोबर निघून जातो आणि त्यानंतरची कामं उत्साहात पार पडतात.
४. चूकीच्या नियोजनात फसणे टाळते.
एखाद्या कामाला पूर्ण होण्यासाठी कितीसा वेळ लागू शकतो याचा अंदाज बर्याच वेळेला चूकतो. जर आपण आपल्या कठीण कामाची सुरुवात दिवसाच्या शेवटी किंवा आपल्या अंतिम मुदतीच्या जवळपास केली तर ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. प्रत्येक गोष्टीकडे पाहणे घाईघाईत राहून जाते आणि या घाईत तणावामूळे आपल्या हातून अजून चूका होतात. याउलट जर कठीण काम सुरुवातीला करायला घेतले तर काम पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ असतो आणि हीच जाणीव आपल्याला तणावमुक्त काम पूर्ण करण्यास मदत करते आणि आपल्या चूकादेखिल कमी होतात.
५. दूसर्याकडून मदत मागण्यासाठी वेळ देते.
कठीण काम आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करु शकतो असे खुप कमी घडते बर्याच वेळा अशा कामांमध्ये आपल्याला कोणाच्यातरी सल्ल्याची किंवा मदतीची गरज भासते. जर तुम्ही कठीण कामाची सुरुवात शेवटी केली तर अशा ऐनवेळी एकतर घाईघाईत कोणाचीही मदत मिळणे कठीण होऊन बसते किंवा आपल्याकडे कोणाची मदत घेण्याचा वेळच उरत नाही. जर हेच काम दिवसाच्या सुरुवातीला झाले तर तुमच्याकडे मदत मागण्यासाठी पुरेसा वेळ असतो.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com