उद्योग हा जेवढा तांत्रिक कौशल्य आणि पैशांवर अवलंबून असतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त तो उद्योजकाची मानसिकता आणि मानसशास्त्रीय जडणघडण यांवर अवलंबून असतो.
#1 स्वतःची इतरांसोबत तुलना करणे टाळा.
आपल्या स्पर्धकांबरोबर किंवा इतर उद्योजक मित्रांसोबत स्वतःची तुलना टाळा.
तुलना मनःशांती घालवते. त्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर फोकस करा. कालपासून आज आपण किती पुढे आलो अशी स्वतःशीच तुलना करा.
#2 व्यवसायात तोटा होण्याची शक्यता गृहीत धरून प्लॅन बनवा
अचानक काही खर्च उदभवतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. असे खर्च आल्यानंतर नुकसान सहन करावे लागते. जर अशाप्रकारे येणाऱ्या अकस्मात नुकसानीची तयारी नसेल तर जो स्ट्रेस येतो तो उद्योजकांचे सर्वात जास्त खच्चीकरण करतो.
#3 स्वतःला पुरेसा मोकळा/आरामाचा वेळ द्या
उद्योजकाला कामाचा उरक भरपूर असतो. सगळं नीट व्हावं, मनासारखं व्हावं म्हणून जातीने उद्योजक स्वतः काम करतो. पण या नादात मानसिक थकवा लवकर येतो. एनर्जी खूप खर्च होते. आणि पुरेसा मोकळा वेळ नसेल तर INNOVATIVE IDEAS येणे कमीकमी होत जाते.
#4 आपले ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठपुरावा करा
उद्योजक विशिष्ट वार्षिक , सहामाही, तिमाही ध्येय न बाळगता काम करत असेल तर खूप मेहनत केल्यावरही results मिळत नाही.
#5 व्यवसायाच्या प्रोसेस वर फोकस करा, results वर नाही.
केवळ turnover/profit अशा आर्थिक ध्येयावर फोकस केले तर results कदाचित मिळतीलही पण त्याच प्रकारे results मिळत राहतील की नाही हे सांगता येणार नाही. सातत्यपूर्ण results साठी रोजच्या प्रोसेस वर लक्ष द्या.
मित्रांनो या होत्या उद्योजकीय मानसिकतेसाठी पाच महत्वाच्या टिप्स. तुम्ही मानसिकदृष्ट्य कणखर बनण्यासाठी कोणती टीप वापरता ते खाली कमेंट्स मध्ये अवश्य लिहा.
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !