4 Days FREE Online Training भाषांतर कौशल्य कार्यशाळा

आपल्या घरूनच, आपल्या आवडीचं काम करून उत्पन्न कमावता येईल अशी उत्कृष्ट व्यवसाय संधी !
ही कार्यशाळा मराठी भाषेमधून, मोफत आणि संपूर्णपणे ऑनलाइन स्वरूपाची असणार आहे

✒️14 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2020, रोज संध्याकाळी 6:30 PM ते 7:30 PM वाजता LIVE सेशन होईल.
,✒️LIVE पाहता न आल्यास रेकॉर्डिंग देखील उपलब्ध असेल.
✒️कार्यशाळेमध्ये सहभागाचे डिजिटल सर्टिफिकेट देण्यात येईल

आजच या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि एका वेगळ्या वाटेवरील करियर संधीचा लाभ घ्या.

आजच्या ज्ञानयुगात भाषांतर कौशल्य हे अत्यंत मोलाचे व्यावसायिक कौशल्य आहे. उत्तम भाषांतराचे कौशल्य असेल तर आपण घरच्याघरीच पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करुन पैसे कमवू शकतो. अनेक कंपन्या, असंख्य अशासकीयसंस्था आणि प्रकाशन संस्थांमध्ये भाषांतरसेवेची सातत्याने गरज असते.

भाषांतरकार होणे फक्त पैसे कमवण्याच्या दृष्टीनेच नाही तर आपली मायभाषा मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी योगदान देणारे सुध्दा काम आहे. भाषांतराचे कौशल्य अवगत करण्यासाठी फक्त मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे पुरेसे नाही तर प्रत्येक कार्यक्षेत्रानुसार भाषांतराची पध्दत वेगवेगळी असते आणि यासाठी भाषांतराचे व्यावसायिक दृष्ट्या कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.

हे लक्षात ठेवूनच आम्ही नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे तुमच्यासाठी खास 4 दिवसांची मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे.
भाषांतर कौशल्य कार्यशाळा​

👉 या ऑनलाइन कार्यशाळेमध्ये तुम्ही काय शिकाल?
१. भाषांतर कौशल्याचा बेसिक आभ्यासक्रम
२. जाहीरातींसाठी भाषांतर करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या व त्यातील व्यवसाय संधी
३. न्यायालयीन, शासकीय व कारदेविषयक दस्तावेजांचे भाषांतर कसे करावे.
४. तांत्रिक मजकूरांचे भाषांतर कौशल्य व त्यातील व्यवसाय संधी.
५. वृत्तपत्रिक भाषांतर कसे करावे व या क्षेत्रात उपलब्ध व्यवसाय संधी.

👉 ही कार्यशाळा कोणासाठी ?
१. कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी
२. मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या लोकांसाठी
३. प्रसार माध्यमाचे, व्यवस्थापन क्षेत्राचे, तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे व कायद्याचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी
४. नवोदित लेखकांसाठी
५. भाषांतराचे कौशल्य आणि मराठी व इंग्रजी भाषेमध्ये एकत्रित काम करु इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी

👉 प्रशिक्षक -
श्री. प्रकाश अल्मेडा
Founder and Director
KnowledgeFountain Group of Institutes

👉 Registration link - https://www.netbhet.com/tsw.html

तर मग भेटूया , कोर्समध्ये ऑनलाइन !
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया !