💪🏼💪🏼 21 दिवसांचा मोफत लाईव्ह फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम

नमस्कार मित्रांनो,

नेटभेट तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सर्वांना उपयोगी ठरेल असा 21 दिवसांचा मोफत लाईव्ह फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

सध्याच्या काळात बाहेर फिरायला किंवा जॉगिंगला जाणे देखील शक्य नाहीये, अशावेळी घरूनच योग्य तो व्यायाम करून आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी आम्ही फिटनेस मास्टर ( पुणे) या संस्थेमार्फत एक 21 Days Body Transformation Challenge पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देत आहोत.

18 जुलै 2020 पासून दररोज संध्याकाळी सात वाजता मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.
यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे मार्गदर्शन, आपल्या शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.

हा कोर्स व्हाट्सअप मध्ये शिकविला जाणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेण्यात येईल. आणि 18 तारखेपासून दररोज लाईव्ह व्हिडिओ ची लिंक व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात येईल !
( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही!

​पंचवीस हजार रुपये किमतीचा हा ऑनलाईन मराठी लाईव्ह कोर्स नेटभेटच्या माध्यमातुन मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.

👉 रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा - https://www.netbhet.com/fitness.html

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत हे माहिती शेअर करायला विसरू नका !

धन्यवाद !

​Team Netbhet