There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Investment हे पैसे वाढवण्याचं एक चांगलं साधन आहे, पण त्यात चुका होणं सहज शक्य आहे. तुम्ही अनुभवी investor असा की नवशिक्या, या सामान्य चुका माहित असणं महत्वाचं आहे. येथे २० मोठ्या चुका आणि त्या कशा टाळाव्यात याची माहिती आहे:
### १. जास्त अपेक्षा ठेवणे
बरेच लोक market मध्ये खूप मोठ्या अपेक्षांसह येतात, ज्यामुळे नंतर निराशा होते. योग्य अपेक्षा ठेवल्याने धीर राखता येतो आणि दीर्घकालीन वाढीवर लक्ष केंद्रित करता येतं. साधारण वर्षाला ७% -१ ० % return ची अपेक्षा ठेवणं योग्य आहे.
### २. Investment चे Goals नसणे
स्पष्ट उद्दिष्टं नसताना investment करणं योग्य नाही. retirement किंवा घर खरेदी यासारखी specific उद्दिष्टं असणं महत्वाचं आहे.
### ३. Diversification नसणे
सगळे पैसे एकाच stock किंवा investment मध्ये ठेवणं धोक्याचं आहे. वेगवेगळ्या investments मध्ये पैसे विभागून ठेवल्याने risk कमी होतो.
### ४. Short-term विचार करणे
अल्पकालीन विचार करणं चुकीचं आहे. यामुळे एक-दोन दिवसांत प्रॉफिट कमावण्याचा विचार करणं किंवा market खाली आलं की घाबरून विकून टाकणं या सारख्या चुका होतात.
### ५. महाग खरेदी आणि स्वस्त विक्री
भावनिक होऊन investment करणं नुकसानकारक ठरतं. बरेच लोक किंमत जास्त असताना खरेदी करतात आणि कमी असताना विकतात.
### ६. खूप जास्त Trading करणे
सतत trading केल्याने तुमच्या returns वर परिणाम होतो. एका अभ्यासानुसार, जास्त trading करणारे investors साधारण ६.५% कमी returns मिळवतात.
### ७. जास्त Fees देणे
जास्त fees देणं हे तुमच्या returns वर परिणाम करतं. ETFs आणि mutual funds सारखे कमी खर्चिक पर्याय निवडणे अधिक उत्तम.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सअॅप कॉम्युनिटी मध्ये सामील व्हा.
https://chat.whatsapp.com/LHWuO5vPRpo8ZAnuU0c6hx
================
### ८. फक्त Tax वर लक्ष केंद्रित करणे
Tax बघणं महत्वाचं आहे, पण फक्त tax च्या आधारे निर्णय घेणं चुकीचं आहे. बरेच लोक टॅक्स वाचवण्याला प्राधान्य देतात. प्रत्यक्षात परतावा किती मिळेल आणि धोका किती कमी आहे यावर फॉक्स हवा.
### ९. नियमित Review न करणे
तुमची आर्थिक स्थिती आणि market सतत बदलत असतं. portfolio चा नियमित review न केल्यास अनपेक्षित धोके उद्भवू शकतात.
### १०. Risk चं चुकीचं आकलन
खूप जास्त risk घेणं किंवा खूप कमी risk घेणं दोन्ही चुकीचं आहे. योग्य प्रमाणात risk घेणं महत्वाचं आहे. जास्त रिस्क मध्ये पैसे जमवण्याचा धोका असतो आणि कमी धोका असेल तर गुंतवणूक कमी वाढण्याचा धोका असतो.
### ११. तुमचा Performance माहित नसणे
बरेच लोक त्यांच्या investments चा performance track करत नाहीत. तुमच्या goals प्रमाणे investments कसं चाललंय हे माहित नसल्यास strategy बदलणं कठीण होतं.
### १२. Media च्या प्रभावाखाली येणे
Media नेहमी short-term market movements वर focus करते, ज्यामुळे भीतीपोटी विकण्याचा निर्णय होतो. शांत राहून long-term plan वर focus करणं महत्वाचं आहे.
### १३. Inflation (महागाईचा दर) विसरणे
Inflation तुमच्या पैशांची खरेदी क्षमता कमी करतं. इतिहासात, inflation दर वर्षी साधारण ४% राहिलंय. एका वर्षात १०० रुपयांची किंमत ९६ रुपये होते, आणि २५ वर्षांत ती ४८ रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा देते आहे ना याकडे लक्ष असुद्या.
### १४. Market Timing करण्याचा प्रयत्न
प्रोफेशनल investors सुद्धा market timing करू शकत नाहीत. market च्या ups and downs चा अंदाज लावण्याऐवजी, dollar-cost averaging (SIP) सारखी consistent strategy वापरणं चांगलं.
### १५. Due Diligence न करणे
Investment करण्याआधी संशोधन करणं महत्वाचं आहे. Financial advisors ची पात्रता तपासणे आणि तुमच्या investments बद्दल बेसिक माहिती असणं गरजेचं आहे.
### १६. चुकीच्या Advisor सोबत काम करणे
योग्य advisor शोधण्यात वेळ लागतो, पण तो वेळ महत्वाचा आहे. चांगला financial advisor तुमच्या long-term goals साठी योग्य strategy बनवायला मदत करतो.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सअॅप कॉम्युनिटी मध्ये सामील व्हा.
https://chat.whatsapp.com/LHWuO5vPRpo8ZAnuU0c6hx
================
### १७. भावनिक होऊन Investment करणे
भावनांच्या आधारे investment चे निर्णय घेणं नुकसानकारक ठरतं. सारासार विचार करून तुमच्या strategy वर ठाम राहणं महत्वाचं आहे.
### १८. जास्त परताव्याच्या मागे धावणे
जास्त returns देणाऱ्या investments मध्ये जास्त risk असते. केवळ returns च्या मागे न धावता, प्रत्येक investment चा risk नीट तपासा.
### १९. Investment सुरू करण्यात उशीर करणे
जितका उशीर कराल, तितका तुमच्या पैशांना वाढण्यासाठी कमी वेळ मिळेल. लहान रक्कमेची सुद्धा compound interest मुळे काळानुसार मोठी वाढ होते.
### २०. तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे
Market तुमच्या नियंत्रणात नसतं, पण तुमची investment strategy, fees, आणि नियमित contributions तुमच्या नियंत्रणात असतात. Market कसंही असलं तरी नियमित छोट्या रकमा invest करत राहिल्यास, दीर्घकाळात चांगली वाढ होऊ शकते.
या सर्व चुका लक्षात ठेवून, rational आणि long-term strategy वापरल्यास, तुमचे returns वाढू शकतात आणि risk कमी होऊ शकतो. या चुकांपासून शिकून तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवता येईल.
टीम नेटभेट