१० अशा गुणवत्ता ज्या यशस्वी लीडर बनण्यासाठी असल्याच पाहीजेत.


१. कामामध्ये सक्रिय सहभाग (Active Participation) :-

एका लीडर च्या दृष्टीने कामामध्ये सक्रिय सहभाग म्हणजे त्याची त्याच्या कामाशी असलेली निकटता. जितके जवळ तुम्ही तुमच्या कामाच्या असाल तितकेच लवकर आणि योग्य निर्णय तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत घेऊ शकता. काम आवडीचे असल्याने त्या कामाशी निगडीत इतर बाबींबद्दल चा तुमचे संशोधन, त्या कामाबद्दलचा तुमचा आभ्यास गाढा असतो आणि याचाच फायदा तुम्हाला तुमच्या ग्राहकांना आणि इतर बाबांना विचारात घेऊन निर्णय घेण्यासाठी होतो.

२. टीमशी नाते (Engagement) :-

एक लीडर म्हणून तुमचे तुमच्या टीम शी असलेले नाते खुप महत्त्वाची भूमिका ठेवते. तुमच्या टीमला या क्षेत्रात भक्कम रोवण्याचे काम एक टीम लीडर म्हणून तुमचे असते. यामुळे तुमच्या टीमला या क्षेत्रात टीकून राहण्यासाठी मदत होतेच पण तुमचे एकत्रीत ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांच्यातील आवड आणि गुण मुक्त करण्याची त्यांना प्रेरणा मिळते.

३. प्रभाव (Influence) :-

थेट संपर्कात न येता सुध्दा स्वत:चा इतरांना प्रभावित करणे हे एक लीडर म्हणून खुप महत्वाचे आहे. सकारात्मक प्रभाव प्रेरणेची आणि सहकार्याची ठिणगी पेटवण्याची ताकद ठेवतो.

४. नावीन्य (Innovation) :-

इतरांपेक्षा काहीतरी नविन तयार करुन आपली छाप सोडणे हे एका लीडर ला जमलेच पाहीजे. त्यासाठी लीडर ने प्रत्येक पातळीवर क्रियेटीव्हीटी आणि इनोवेशन ला प्रोत्साहन दिले पाहीजे. लीडर ने सतत प्रयोगशील आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी तत्पर असले पाहीजे अर्थातच अपयशाची परवानगी लीडरला सुध्दा असते.

५. संवाद कौशल्य (Communication) :-

उत्तम संवाद कौशल्य हा लीडरशीप चा पाया आहे. संवाद कौशल्यामुळे टीमचे नेतृत्व पक्के होते, तुमच्या बिझनेसवर आणि ग्राहकांवर चांगला प्रभाव पडतो. तुमच्या कल्पना , कामाचे विश्लेषण अशा इतर अनेक गोष्टींवर तुमचे विचार मांडणे आणि पटवून देणे सोपे जाते.

६. समस्या सोडवण्याची क्षमता (Problem Solving) :-

एक लीडर म्हणून समस्या सोडवणे हे तुमचे सततचे काम असले पाहीजे. समस्येवर तात्पुरता उपाय शोधणे हे तुमचे लक्ष नाही तर त्या समस्येवर पूर्ण अभ्यास करुन कायमचा त्या समस्येवर उपाय शोधणे हे तुमचे उद्दीष्ट असले पाहीजे जेणेकरुन बिझनेसच्या वाढीच्या दृष्टीने तुमच्या निर्णयाचा योग्य परिणाम होईल.

७.पारदर्शकता (Transparency) :-

पारदर्शकतेमुळे व्यावसायिक संबंध घट्ट होतात. कामातील पारदर्शकता विश्वास, सत्यता आणि कामात उच्च स्तरीय बदल घडवून आणण्यास मदत करते.

८. अनुकूलनक्षमता (Adaptability) :-

नवीन परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलण्याची क्षमता लीडरला अचानकपणे येणार्‍या आणि बदलणार्‍या परिस्थितीशी सामना करण्यासाठी बळ देते. ही क्षमता लीडरमध्ये असेल तर तो स्वगुणांचा वापर करुन आत्मविश्वासाने अशा अचानक आलेल्या आव्हानांना सामोरे जातो.

९. सहानुभूती (Empathy) :-

इतरांबद्दल सहानुभूती असण्या बरोबरच मनपूर्वक ऐकणे आणि नम्रता या दोन गोष्टींची जोड असेल तर टीम मधील कार्यक्षमता आणि मनोबल वाढण्यास मदत होते.

१०. सतत शिकत राहणे (Continuous Learning) :-

नवनवीन गोष्टी करण्यासाठी लीडरने सतत शिकत राहणे फार महत्त्वाचे असते. बदलत्या काळाबरोबर आपली असलेली कौशल्य तीक्ष्ण करण्यासाठी आणि काळानुसार नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी, नवीन दृष्टीकोन आचरणात आणण्यासाठी लीडरने शिकण्यासाठी सतत भुकेलेले राहणे गरजेचे असते.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई -लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतुन शिकूया , प्रगती करूया !

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy