There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मित्रांनो,
आपल्यापैकी प्रत्येकालाच आयुष्यात श्रीमंत व्हायचं असतं. त्यासाठी आपण बरीच खटपट करत असतो.. पण तरीही आपली आर्थिक गणितं आणि आपलं जीवनमान यांचा ताळमेळ बसवणं खूप अवघड जातं. मग आपल्याला वाटतं, एखादं लॉटरीचं तिकीट घेऊन पाहू, किंवा असं काहीतरी करू ज्यातून आपल्याला प्रचंड आर्थिक फायदा होईल.. परंतु प्रत्यक्षात फार कमी लोकांचंच नशीब असं फळफळतं आणि ते अगदी अल्पावधीत आणि अल्प श्रमात श्रीमंत होतात.. पण मग, आपल्यासारख्या माणसांनी श्रीमंतीची स्वप्न विसरून जायची का.. ? तर .. नाही.. आपण श्रीमंत होण्यासाठी स्वतःला काही चांगल्या सवयी लावायच्या.. आर्थिक बाबींबद्दलच्या या चांगल्या सवयी तुम्हाला कधी ना कधी निश्चितच उत्तम परतावा, अर्थात आर्थिक भरभराट देतील यात शंका नाही.
चला तर मग, जाणून घेऊया या 10 उत्तम आर्थिक सवयी ज्यांचा तुम्हाला जीवनात निश्चितच फायदा होईल -
1. जीवनाचं उद्दीष्ट ठरवा -
मॅट डॅनिअल्सन इन्व्हेस्टोपीडीयावर विचारतात, 'तुमच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय ?' या प्रश्नाचं उत्तर अनेकजण काहीतरी अस्पष्टसं देतात. मला खूप श्रीमंत व्हायचंय असं एक ठोकळ उत्तर नको, त्यापेक्षा एक विशिष्ट उद्दीष्ट, स्पष्टपणे ठरवा. एका वहीत तुमचं जीवनाचं आर्थिक उद्दीष्ट, त्यासाठी तुमची जीवनशैली कशी असेल आणि वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तुम्ही तुमचं उद्दीष्ट साध्य कराल या तिन्ही बाबी स्पष्ट लिहा. जितकी स्पष्ट उद्दीष्ट, तितकी ती गाठणं सोपं हे लक्षात ठेवा.
याखेरीज, तुमच्या सध्याच्या वयापासून उलट गणना करत तुम्ही आजवर तुमच्या जीवनात वयाच्या कोणत्या वर्षी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत गेलात त्याचे माईलस्टोन एका कागदावर नोंदवून ठेवा. आणि भविष्यात आता तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कितव्या वर्षीपर्यंत कसे कसे सक्षम व्हायचे आहे याचे लक्ष्य ठरवा व तो कागद आपल्या फायनान्शिअल प्लॅनरच्या अगदी सुरुवातीलाच जोडून ठेवा.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
2. अंथरूण पाहून पाय पसरा -
आर्थिक बाबतीत अंथरूण पाहून पाय पसरा ही म्हण फार महत्त्वाची आहे, किमान तोपर्यंत तरी, जोपर्यंत तुम्ही तुमची आर्थिक उद्दीष्ट साध्य करत नाही. अर्थातच, तुमच्याजवळ जितके पैसे असतील त्यांचा विनीयोग नीट विचारपूर्वक व गरजेपुरताच करा. असे वागल्याने तुम्ही अनेक बाबींपासून स्वतःला सुरक्षित ठेऊ शकता. जसं,
- यामुळे तुमच्या डोक्यावर कधीही कर्जाचा बोजा नसेल.
- ताण आणि अतिविचाराच्या समस्येला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही.
- तुमच्या क्रेडीट कार्डाचे हफ्ते भरायची तुमच्यावर कधी वेळ येणार नाही.
- तुम्ही आर्थिक सुरक्षितता कायम अनुभवाल.
- तुम्ही पैसे जोडण्याची तुमची क्षमता विकसीत करू शकाल.
आणि अर्थातच हे वाटतं तितकं सोपं नाहीये.. कारण, यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध जीवन जगावं लागले आणि तसंच लहानमोठ्या तडजोडी आनंदाने स्वीकाराव्या लागतील. मात्र, जर तुम्ही अशी जीवनशैली स्वीकारलीत तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल.
अशी जीवनशैली हवी असेल तर त्यासाठी या काही टिप्स -
- 50/30/20 नियमानुसार बजेट तयार करा. अर्थात, तुमच्या उत्पन्नाच्या 50 टक्केच रक्कम खर्च करा. त्यापैकीही केवळ 30 टक्के रक्कम प्रत्यक्ष गरजांसाठी खर्च करा आणि उरलेले 20 टक्के रक्कम सुद्धा पुन्हा तुमच्या सेव्हींग अकाऊंटमध्ये जमा करत जा. अशारितीने खर्चाचं नियोजन दरवेळी करा.
- तुमच्या गरजांवर खर्च करण्यापूर्वी स्वतःवर खर्च करा. अर्थात, सर्वप्रथम तुमचा वृद्धापकाळ, तुमची दुखणी यांसाठी तुमच्या अर्थार्जनातील रक्कम बाजूला ठेवत चला, आणि मग उरलेल्या रकमेतून तुमच्या गरजांची पूर्तता करा.
- फालतू खर्च अजिबात करू नका.. जसं की, उदाहरणार्थ, ती एखाद्या जिमची मेंबरशिप जी तुम्ही कधीच वापरणार नाही आहात.. असले खर्च अजिबात करू नका.
- श्रीमंतीचा आव आणणाऱ्या मित्रांपासून लांबच रहा, कारण, ते श्रीमंत असल्याचा दिखावा करत असले तरीही प्रत्यक्षात ते कर्जबाजारीही असू शकतात.
- किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू किंवा प्रवासासाठीही पूर्ण रक्कम देण्याऐवजी सवलतीची प्रतीक्षा करा. सवलतीच्या किंमतीच्या ऑफर्समध्ये खर्च करणे ही एक उत्तम सवय आहे जर तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायचे असेल तर..
- तुमच्या कर्जाचे स्वरूप बदला. तुमच्यासाठी कर्जाची परतफेड करणे अधिक सोयिस्कर करा. त्यासाठी कर्जदारांबरोबर अधिक चांगल्या वाटाघाटी करायला शिका.
याशिवाय आणखी अन्य 8 उत्तम आर्थिक सवयींविषयी सविस्तर वाचा पुढल्या मंगळवारी, याच लेखाच्या दुसऱ्या भागात ..
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com