There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
गेल्या आठवड्यात एक तरुण मुलगा ऑनलाईन कन्स्लटिंगसाठी झूम कॉल वर भेटला होता. त्याला स्टार्टअप सुरु करायचं होतं. त्याच्याकडे एक चांगली बिझनेस आयडीया होती. आणि त्यावर तो बरेच दिवस काम करत होता.
त्याच्यामते त्याची आयडिया इतकी चांगली होती की तो ती मला सांगायलाही कचरत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते :
- माझी आयडिया उघड केल्यास कोणीतरी ती कॉपी करेल का?
- माझ्या स्पर्धकांनी माझ्या बिझनेसची रणनीती कॉपी केली तर काय होईल?
- माझ्या कल्पनेचे पेटंट (patent) घ्यायला हवे का? (खरंतर फक्त कल्पनेचं पेटंट घेता येत नाही. बऱ्याचदा लोकांना हे माहीतच नसतं !)
https://www.facebook.com/share/p/1FEJiL1a14/
यावर माझं उत्तर नेहमीच एकच असतं: हो, कोणीही तुमची कल्पना कॉपी करू शकते आणि अनेक लोकांनी तसा प्रयत्न केलाही आहे. तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल तर ग्राहकांना तुमची कल्पना सांगावीच लागणार ? सुरुवात करण्याच्या आधी जरी कोणाला सांगितली नाही तरी सुरुवात केल्यानांतर कॉपी करणारे असंख्य लोक येतीलच.
पण मग तुम्ही अशा परिस्थितीत काय कराल?
मॅकडोनाल्ड्सने जे केले, तेच करा!
मॅकडोनाल्ड्स (McDonald's) ही ५० वर्षांपेक्षा जास्त जुनी कंपनी आहे. त्यांच्या बिझनेसची सर्व माहिती, त्यांच्या रणनीती, आणि त्यांच्या कामाची पद्धत (standard operating procedures) अगदी सहजपणे उपलब्ध आहे. कोणीही त्यांच्याकडे नोकरी करून किंवा त्यांच्याबद्दलची पुस्तके वाचून त्यांची कार्यप्रणाली जाणून घेऊ शकतो. लाखो लोकांनी मॅकडोनाल्ड्सची रणनीती कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही आज मॅकडोनाल्ड्स जगातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक आहे.
याचं कारण काय? मॅकडोनाल्ड्सने स्पर्धकांकडे लक्ष देण्याऐवजी फक्त आपल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी हे पहिले की, ग्राहक जे पैसे देतील, त्या बदल्यात त्यांना सर्वोत्तम उत्पादन आणि अनुभव मिळेल. फास्ट फूड उद्योगात अनेक खेळाडू असले तरी, मॅकडोनाल्ड्सने ग्राहकांना सातत्याने उत्तम दर्जाचा बर्गर आणि सेवा दिली. त्यांच्या यशाचे रहस्य प्रतिस्पर्धकांना घाबरण्यात नाही, तर ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यात आणि त्यांना उत्तम सेवा देण्यात आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
Execution is way more important than Idea/Strategy !
माझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये, मी आता स्पर्धकांची फारशी काळजी करत नाही. मला खात्री आहे की, आपला व्यवसाय यशस्वी होणार की नाही हे स्पर्धकांवर अवलंबून नाही. जर आपण अयशस्वी झालो, तर त्यामागे एकच कारण असेल: आपल्या ग्राहकांना योग्य उत्पादन किंवा सेवा मिळाली नाही.
तुमची कल्पना किंवा रणनीती कोणीही कॉपी करू शकते. पण तुमचे ग्राहक तुमच्यासोबत का राहतील? कारण त्यांना तुम्ही देत असलेला अनुभव आणि सेवा इतरत्र मिळणार नाही. त्यामुळे स्पर्धकांची भीती सोडून द्या आणि तुमच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करा. त्यांना असा अनुभव द्या, जो कोणीही कॉपी करू शकणार नाही.
तुमचं यश तुमच्या हातात आहे, स्पर्धकांच्या नाही!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !