बदलांना सामोरे जायला शिकवणारं छोटंसं पुस्तक ! 

हू मूव्ह्ड माय चीझ /Who Moved My Cheese 🐭🐭 🧀🧀 

#Saturday_Bookclub

मित्रांनो,

आज आपण ज्या पुस्तकाची माहिती घेणार आहोत ते एक अतिशय छोटसं , गोष्टीरूपात असलेलं पुस्तक आहे. अगदी एकाच तासात वाचून होईल असं. पण या पुस्तकाचा प्रभाव संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारा असू शकतो.

दोन छोटे उंदीर स्करी आणि स्निफ 🐭🐭 यांची आणि हेम आणि हॉ 👬 या दोन माणसांची गोष्ट सांगणारं हे पुस्तक. या पुस्तकाचे लेखक स्पेन्सर जॉन्सन यांनी मोठ्या रंजकतेने जीवनाचे धडे या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेले आहेत.

आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनात 'बदल' ही एकच शाश्वत गोष्ट आहे. आपल्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक बदलाबरोबर आपलं जीवन पुढे पुढे सरकत असतं.. पण अनेकजण या बदलांना सामोरे जायला घाबरतात. याचं कारण, एकतर त्यांना त्यांचा कम्फर्ट झोन सोडायचा नसतो किंवा त्यांच्या मनात प्रचंड भीती असते.

ही भीती भविष्याबद्दल तर असतेच परंतु आपल्याला जे हवं ते मिळालं नाही, किंवा आपल्याला जे करायचंय ते आपण करू शकलो नाही तर काय होईल या अतिविचाराने ते गांगरलेले असतात. बरेचदा, या विचारानी ते स्वतःतील क्षमतांचाही वापर करत नाहीत. अशा सगळ्या माणसांना जीवनात कधीच त्यांचं लक्ष्य साध्य करता येत नाही. अशी माणसं एका जागी साचल्या पाण्यासारखी होतात, त्यांच्यातलं प्रवाहीपण केव्हाच संपून जातं.

याउलट, जी माणसं बदल स्वीकारतात, बदलांना आनंदाने सामोरं जातात आणि त्यानुरूप स्वतःच्या जीवनाची वाट पुढे पुढे चालत रहातात, त्यांचं जीवन मात्र आनंदाने फुलतं. अपयश आलं तरीही ते चालणं थांबवत नाहीत, ते पुन्हा पुन्हा उठतात नि पुढे जात रहातात. त्यांना हवं ते मिळेपर्यंत ते चालत रहातात..

जीवनाची ही कथा तुम्ही हू मूव्ह्ड माय चीझ या पुस्तकात वाचू शकता. सध्या कोरोना काळात आपल्याला अनेक बदल पचवायला लागले. भविष्यात अशा बदलांना आपणहून सामोरे जाण्याची ताकद देणारे हे पुस्तक जरूर वाचा.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

📚📚 येथे क्लिक करून हे पुस्तक मिळवता येईल- https://bit.ly/who-moved-my-cheese-book

चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकातील काही महत्त्वाचे धडे -
✔️प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःशी खरं बोलणे आणि ईमानदारी म्हणजे इतरांशी खरं बोलणे.

✔️जीवन पुढे सरकत जाणारच आणि आपणही त्यासोबत पुढे गेलंच पाहिजे !

✔️जर तुमच्या मनातून भिती गेली तर तुम्ही काय केलं असतं..?(ते करा !)

✔️तुम्हाला ज्याची खूप भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात नेहमीच तितकी भीतीदायक नसते जितकी ती तुम्हाला वाटते. तुमच्या मनात जितकी भीती तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी तयार करता खरंतर प्रत्यक्षात त्या गोष्टीपेक्षा तुमच्या मनातली भीतीच फार भयंकर असते.

✔️अनामिक भिती ही भावना आहे, तिचं रूपांतर "चिंता" या सवयीत होतं. जेव्हा आपण भिती ला दूर करतो तेव्हा आपोआप आनंदी होतो

✔️तुमचं नेमकं काय चुकतंय ते बघा, त्यावर हसा, त्यात बदल करा आणि पूर्वीपेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने ती गोष्ट करा.

✔️एखादी गोष्ट सोडून देण्याच्या भीतीपेक्षा जेव्हा ती गोष्ट धरून बसण्याचं दुःख वाढतं तेव्हाच बदल घडतो.

✔️जर तुम्ही बदलला नाहीत तर तुम्ही नामशेष व्हाल.

✔️जेव्हा तुमचे दृढ विश्वास तुम्ही बदलता, तेव्हाच तुम्ही तुमच्या कृतीत बदल घडवू शकता.

✔️तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही पण तुम्ही त्यापासून शिकू शकता. जेव्हा पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते, तेव्हा तुम्ही त्याच गोष्टी आता पूर्वीपेक्षा वेगळेपणाने करून तुमचा वर्तमान आणखी आनंदी, प्रभावशाली आणि यशस्वी घडवू शकता.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2025 Privacy policy Terms of use Contact us Refund policy