"मरणालाही हरवणारा विजेता – निकी लॉडाची कहाणी"

१९७६ मध्ये निकी लौडा (Niki Lauda) फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन होता.

न्युर्बुर्गरिंग येथील कार रेसिंग चा ट्रॅक खूप धोकादायक आहे असं त्याने शर्यतीआधीच सांगितलं होतं पण तेव्हा लोकांनी त्याचं ऐकलं नाही.

सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि शर्यत सुरु झाली. दुर्दैवाने रेसदरम्यान निकीचं बोलणं खरं ठरलं – त्याचा अपघात झाला. कार पेटली, हेल्मेट वितळलं, चेहरा आणि डोळे जळाले.

जळत्या कारमधल्या धुराचे विषारी वायू त्याच्या फुफ्फुसात गेले.

त्याचे केस, डोळ्यांच्या पापण्या, चेहरा सगळा जळून गेला.

ताबडतोब त्याला रुग्णालयात हलवलं. पण तो कोमात गेला. सगळ्यांना वाटलं की तो आता गेलाच.

पण तो मेला नाही. त्याने स्वतःला बरे होण्यासाठी भाग पाडलं.

संपूर्ण अंगावर पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत तो हॉस्पिटल मधून बाहेर पडला. आणि फक्त सहा आठवड्यांत तो पुन्हा रेसिंग ट्रॅकवर उतरला.

नुसताच उतरला नाही तर जिंकण्यासाठी खेळला. दुर्दैवाने

तो फक्त एका पॉईंटने चॅम्पियनशिप हरला.

पुढच्या वर्षी डॉक्टरांनी त्याच्या उरलेल्या कानाच्या त्वचेचा उपयोग करून त्याच्या पापण्या पुन्हा तयार केल्या. त्याच्या व्याधी बऱ्याच सुधारल्या. यावेळी मात्र त्याने त्याच्या वाईट नशीबाला हरवलं.

आणि तो पुन्हा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन झाला.

खरतर यावेळीही त्याच्या कार मध्ये काही खराबी झाली होती. शेवटच्या आठ फेऱ्यांमध्ये तेलदाबाचा इशारा दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून निकीने रेस पूर्ण केली.

त्यांनंतर सात वर्षांनी, जेव्हा सगळ्यांना वाटलं की निकी आता संपला. त्पण तो पुन्हा परतला आणि तिसऱ्यांदा जागतिक विजेता ठरला.

फॉर्म्युला वन मध्ये आपली कर्तबगारी दाखविल्यानंतर निकी तिथे थांबला नाही.

पुढे तो विमान उडवायलाही शिकला आणि Lauda Air ही स्वतःची एअरलाईन सुरु केली.

१९९१ मध्ये Lauda Air चं एक बोईंग विमान बँकॉकजवळ कोसळलं. २२३ लोकांचा मृत्यू झाला.

लौडाने बोईंगला विचारलं – “अपघात का झाला?”

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

बोईंगने उत्तर दिलं – “इंजिनचा reverse thrust उड्डाण चालू असतानाच लागला, पण वैमानिकाला तो परत फिरवता येतो. वैमानिकाला विमान वाचवता आलं असतं.”

स्वतः विमान चालविणे शिकल्यामुळे निकिला हे पटत नव्हतं. त्याला माहीत होतं – हवेत असताना अचानक इंजिन मागे ढकलायला लागलं, तर विमान वाचवणं अशक्य आहे.

बोईंग म्हणालं – “नाही, शक्य आहे. ही तुमची चूक आहे.”

स्वतः मृत्युला हरवून आलेला निकी एवढ्या सहज हार मानणे शक्यच नव्हते.

त्याने बोईंगकडे आग्रह धरला की सिम्युलेटरवर तसाच प्रसंग घडवावा.

पंधरा वेळा प्रयत्न झाला. त्याने स्वतः पण प्रयत्न करून पहिला. पण प्रत्येक वेळेस विमान कोसळलं.

शेवटी बोईंगच्या इंजिनियर्सना मान्य करावं लागलं – की विमान वाचवता आलं नसतं.

पण बोईंग कंपनीने चालढकल सुरू केली. त्यांनी वकीलांची मदत घेऊन कायदेशीर विलंब करण्याचा प्रयत्न केला.

निकी लौडाने न खचता पत्रकार परिषद घेतली आणि बोइंगला थेट आव्हान दिलं -

“जर बोईंगला खात्री आहे की विमान वाचवता येतं, तर त्यांनी दोन अनुभवी पायलट्स निवडावेत. मी स्वतः त्यांच्यासोबत विमानात जाईन. आणि आकाशात reverse thrust चालू करू.

बोईंग बरोबर असेल तर आम्ही वाचू. बोईंग चुकीचं असेल तर आम्ही सारे मरू – आणि ते जगभरातील मीडियासमोर होईल.”

शेवटी बोईंगने जबाबदारी मान्य केली. निकी पुन्हा एकदा जिंकला.

बॉस ओरडला, प्रमोशन झालं नाही, प्रेमात अपयश आलं, किंवा परीक्षेत नापास झालो….अशा कारणासाठी जर हार मानत असाल तर आव्हान म्हणजे काय आणि त्याच्यावर मात कशी करायची हे निकी लौडा कडून नक्कीच शिकता येईल.

निकीच्याच शब्दात सांगायचे तर “जेव्हा पण मी एखादं आव्हान बघतो, तेव्हा मीच त्याच्यावर धावून जातो!”

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !