"रॉकी ​​तत्वज्ञान: तुम्ही किती हिट्स घेऊ शकता आणि पुढे जात राहू शकता?"

रॉकी ही चित्रपट मालिका माझी आवडती आहे. त्यामध्ये एका भागात रॉकी आपल्या मुलाला उद्देशून एक डायलॉग म्हणतो. चित्रपटसृष्टीत सर्वाधिक गाजलेल्या डायलॉगपैकी हा एक असावा !
त्यात म्हातारा बॉक्सर रॉकी आपल्या मुलाला सांगतो – "हे जग म्हणजे सूर्यप्रकाश आणि इंद्रधनुष्य नाही. हे जग खूप निर्दयी आणि क्रूर आहे. ते तुला गुडघ्यावर आणेल आणि तिथंच ठेवेल… जर तू परवानगी दिलीस तर. जगात कोणताच माणूस इतके कठीण फटके मारू शकत नाही जितकं जीवन मारतं. पण मुळात प्रश्न एवढाच आहे – तू किती फटके सहन करू शकतोस आणि तरीही पुढे चालत राहू शकतोस? तू किती सहन करतोस आणि तरीही हार मानत नाहीस – हेच खरं यश आहे!
आणि जर तुला माहित असेल की तू काय कमावण्यायोग्य आहेस, तर ते मिळवण्यासाठी फटके खायची तयारी ठेव. दोष देणं सोड. कारण ते भित्रे लोक करतात. तू तसला नाहीस – तू त्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेस!"
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

या एका संवादात जगण्याचं आणि जिंकण्याचं संपूर्ण तत्वज्ञान सामावलेलं आहे. आयुष्य सुंदर आहे, हो… पण ते सोपं नाही. पटकन काही मिळत नाही. मनातून माहित असतं की"आपण योग्य आहोत… पण तरीही यश येत नाही." आणि मग हळूहळू आपल्या मनात दबक्या आवाजात एक शंका डोकावू लागते – "माझ्यात काहीतरी कमी आहे का?"
माझ्या मते, ही शंका हाच भीतीचा खरा चेहरा असतो. Doubt. The real face of fear.
भीतीचं खरं स्वरूप काय असतं याची एक सुंदर झेन गोष्ट आहे – एका योद्ध्याने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाईला सामोरं जाताना भीतीसमोर वाकून विचारलं, “मी तुला कसं हरवू शकतो?” भीतीने उत्तर दिलं – “मी पटकन बोलते, खूप जवळ येते आणि तुला अस्वस्थ करते. मग तू माझं ऐकतोस आणि हरतोस. पण जर तू माझं ऐकलंच नाहीस… तर मी काहीच करू शकत नाही.”
तोच क्षण असतो जेव्हा आपण भीतीवर मात करतो. कारण भीती आपल्याला मागे खेचत नाही… भीतीमुळे निर्माण होणारी शंका आपल्याला मागे खेचते.
खरं धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे – तर ती एक आतली छोटीशी ताकद आहे जी भीतीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, "हो, मला भीती वाटते. पण मी घाबरत घाबरतच पुढे जाईन. कारण थांबणं माझा स्वभाव नाही."
एकेकाळी मलाही वाटायचं – "जग त्यांचं आहे जे पॉवरफुल आहेत. ज्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. ज्यांचा आवाज भारदस्त आहे, ज्यांची उपस्थिती प्रभावी असते, आणि मी? मला वाटायचं, माझ्याकडे हे काहीच नाही!
पण कालांतराने समजलं – ही गुणवैशिष्ट्यं असणं चांगली गोष्ट आहे, पण ती नसण्याने कोणताही कमीपणा येत नाही.
कारण आयुष्य कुणालाच सोडत नाही. प्रत्येकाला आपले आपले फटके बसणारच. त्यावेळेला आपल्याकडे असावं लागतं ते म्हणजे – तग धरण्याचं बळ Resilliance. तुमचं व्यक्तिमत्त्व काहीही असो, जर तुमच्याकडे Resilliance म्हणजे तग धरायची शक्ती असेल… तर शेवटी नशिबालाही तुमच्यासमोर झुकावं लागेल!
काही लोकं जबाबदारी झटकतात, दोष दुसऱ्यांवर ढकलतात. काही लोकं हार मानतात… पण काही लोकं? ते पुन्हा मैदानात उतरतात!
सचिन तेंडुलकर पंधरा वर्षांचा असताना पाकिस्तानात मोठ्या तेज गोलंदाजांचा सामना करत होता. एक चेंडू उसळून सचिनच्या हनुवटीला लागला. समोर उभा असलेला सिद्धू धावत सचिनकडे आला. म्हणाला, तू retired hurt होऊन परत जा. पण तेव्हा सचिन त्याच्या नाजुकश्या आवाजात म्हणाला "मै खेलेगा !!" हा आहे Resilience !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

अलिबाबाच्या जॅक मा ला ३० वेळा नोकरी नाकारली गेली. साधा KFC चा जॉब पण त्याला मिळाला नाही. तरीही तो खचला नाही प्रयत्न करत राहिला. आज जगभर जॅक मा "यशस्वी उद्योजकांचं प्रतीक" बनला आहे. हा आहे Resilience !
आज जर तुम्ही करिअरमध्ये स्ट्रगल करत असाल, व्यवसायामध्ये अपेक्षित यश येत नसेल, किंवा काहीतरी वेगळं करू पाहत असाल – तर स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा –
"मी किती फटके सहन करू शकतो आणि तरीही पुढे चालत राहू शकतो?"
कुणाला दोष देणं नाही, तक्रारी नाहीत, कारणं नाहीत… फक्त प्रयत्न, प्रयत्न आणि पुन्हा प्रयत्न!
आपण समुद्रासारखे व्हायचं. ओहोटी आली म्हणून शांत बसायचं नाही.
"मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना।
मैं समंदर हूँ — लौटकर वापस ज़रूर आऊँगा!"
स्वभाव, आवाज, करिष्मा, नशिब – यांच्यापेक्षा मोठं काही असेल तर ते आहे – तग धरायचं बळ. Resilience. जे तुमच्यात आहे, आणि ज्यामुळे तुम्ही यशस्वी होणार — नक्की!

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !