There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
गुंतवणूक सुरु करण्याची खरी वेळ "आता" आहे !
जितक्या लवकर सुरुवात कराल तितकं चांगलं - याचं कारण आहे compounding effect (चक्रवाढ).
समजा तुम्ही दर महिन्याला फक्त ५००-१००० रुपये बाजूला काढले, तरी काही वर्षांत तुमची संपत्ती किती वाढू शकते ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे सगळं compounding च्या जादूमुळे शक्य होतं.Compounding म्हणजे काय? तुमच्या पैशांवर मिळणाऱ्या नफ्यावर पुन्हा नफा मिळणं.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================
साधं उदाहरण घेऊया -
तुम्ही १०० रुपये गुंतवले आणि त्यावर दर वर्षी १०% नफा मिळवीला.
तर पहिल्या वर्षी तुमचे पैसे वाढून ११० रुपये होतील.
दुसऱ्या वर्षी ते १२१ रुपये होतील.
का? कारण तुम्हाला मूळ १०० रुपयांवर आणि पहिल्या वर्षी मिळालेल्या १० रुपयांवरही नफा मिळतो (१० रुपयांवर १०% = १ रुपया).
१०० रुपयांचं उदाहरण खूप छोटं आहे. चला एक मोठं उदाहरण पाहू.
सारिकाने २५ व्या वर्षी नोकरी सुरू केली तेव्हा तिने दर महिन्याला १०,००० रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि पुढची २५ वर्षं तसंच चालू ठेवलं. म्हणजे तिने एकूण ३० लाख रुपये गुंतवले. जर तिच्या पैशांवर दर वर्षी १२% नफा मिळाला, तर ५० व्या वर्षी तिच्याकडे जमा होतील चक्क १.८ कोटी रुपये!
याउलट, जर तिच्या पैशांवर simple interest मिळाला असता (जिथे फक्त मूळ रकमेवर व्याज मिळतं), तर तिला फक्त ७५ लाख रुपये मिळाले असते. म्हणजे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त फरक!
ही आहे compounding ची जादू.
Compounding मुळे तुम्ही छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकता - पण लवकर सुरुवात करणं महत्त्वाचं आहे.
समजा सारिकाने सुरुवातीचा वेळ वाया घालवला आणि १० वर्षं उशीरा, ३५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. हा गमावलेला वेळ भरून काढण्यासाठी तिने १५ वर्षं दर महिन्याला १७,००० रुपये गुंतवले. तिने तीच ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि तोच १२% नफा मिळाला, तरी पंधरा वर्षांनंतर तिच्याकडे फक्त ८५ लाख रुपये जमा होतील. म्हणजे लवकर सुरुवात केली असती तर मिळाले असते त्यापेक्षा ९५ लाख रुपये कमी!
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
===============
आपण साध्या वाढीचा (simple interest) विचार करू शकतो, पण चक्रवाढीचा (compound interest) विचार करणं कठीण जातं. १०% दराने वाढणारी गुंतवणूक १० वर्षांत दुप्पट होते, पुढच्या १० वर्षांत सहा पट होते आणि त्यापुढच्या १० वर्षांत सोळा पट होते - हे बहुतेकांना कळत नाही.
होय, ९५ लाख रुपये. एवढं नुकसान होतं उशीर केल्यामुळे.
आता तुम्हाला कळलं असेल की आजच गुंतवणूक करायला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे - कुठे गुंतवणूक करायची आणि compounding चा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा? पुढच्या भागात आपण याची उत्तरं शोधूया.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
https://Learn.netbhet.com