There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
१९व्या शतकाच्या मध्यात युरोपमध्ये ‘फ्रेड’ नावाच्या एका व्यक्तीने एक लहानसा पेपर मिल व्यवसाय सुरू केला. पहिल्या टप्प्यात ही एक साधी, लहानशी कंपनी होती, पण हळूहळू तिचं काम चांगलं सुरू झालं. जसजसा व्यवसाय वाढू लागला तसं फ्रेडला वाटू लागलं की व्यवसाय आणखी वाढवायचा असेल तर नवीन ठिकाणी विस्तार करावा लागेल. भविष्याचा वेध घेऊन त्याने हा निर्णय घेतला—आणि हा निर्णय त्याच्या फायद्याचा ठरला.
सुरुवातीला कागदाच्या लगद्याच्या व्यवसायात भरभराट झाल्यानंतर, फ्रेडसोबत ‘लिओ’ नावाचा त्याचा मित्र कंपनीत आला. लिओकडे मोठी स्वप्नं होती. वीजनिर्मितीच्या नव्या उद्योगाने तो प्रभावित झाला होता आणि त्याने कंपनीला बदल करण्याचा सल्ला दिला. आणि कंपनीने बदल केला—कागदाच्या लगद्यापासून वीज निर्मितीकडे वाटचाल सुरू झाली. ही गोष्ट त्या कंपनीसाठी तर फायदेशीर ठरलेलेच पण सोबत त्या भागासाठी वरदान ठरली. वीजपुरवठा उपलब्ध झाल्याने इतर अनेक उद्योगांना त्या भागाने आकर्षित केलं.
https://www.facebook.com/share/p/15bDAjCfZA/
पुढे कंपनीने वीज निर्मितीपासून रबर उत्पादनात प्रवेश केला, आणि नंतर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात. सोव्हिएत युनियन त्यांचा मोठा ग्राहक होता. सोव्हिएत युनिअन सोबत व्यवसाय करणे सोपे नव्हते. त्याचवेळी अमेरिकेने त्यांना सोव्हिएत युनियनची माहिती पुरवण्यासाठी सांगितले. कंपनीला अमेरिकन मार्केटमध्ये व्यवसाय करायचा असल्यास असे करणे भाग होते. हा व्यवसाय नफ्यात होता, पण शीतयुद्धाच्या काळात नैतिकदृष्ट्या गुंतागुंतीचा होता. याही टप्प्यावर कंपनीने ‘बदल स्वीकारण्याचं’ तत्त्वज्ञान पाळलं. १९७०च्या दशकात त्यांनी टीव्ही बनवण्याचा प्रयत्न केला. त्यातही ते यशस्वी झाले आणि युरोपमधील आघाडीच्या टीव्ही उत्पादकांपैकी एक बनले.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
१९८०च्या दशकाच्या शेवटी त्यांनी पुन्हा दिशा बदलली—यावेळी पर्सनल कॉम्प्युटरच्या व्यवसायात पाऊल टाकलं. प्रत्येक नवीन सीईओसोबत कंपनीने जुन्या विभागांना बाजूला करून नवीन संधी स्वीकारल्या. त्यांनी नेहमी भविष्याचा मागोवा घेतला आणि अनेकदा उद्योगातील नवे स्टँडर्ड्स तयार केले.
शेवटी त्यांना एक सुवर्णसंधी हाती लागली. —व्यवसायिकांऐवजी ग्राहकांना लक्ष्य करणे (from B2B to B2C). ही रणनीती उत्तम रितीने चालली...त्या कंपनीने या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली. जगभरात त्यांचं नाव झालं. त्यांचा ब्रँड जगातील सर्वोत्तम पाच ब्रॅंड्सपैकी एक बनला.
पण एकेकाळी चपळ आणि सतत बदल स्वीकारणारी कंपनी त्यांच्या नव्या बाजारातील एक महत्त्वाचा टप्पा ओळखण्यात मागे पडली. जगातील पाचव्या क्रमांकाचा ब्रँड असलेली कंपनी अचानक घसरली. विडंबना अशी की, जी कंपनी आयुष्यभर सतत काळाच्या पुढे राहण्यासाठी बदल करत आली तिच्या घसरणीचं मुख्य कारण "योग्य वेळी बदल न करणे" हेच ठरले !
त्या कंपनीचे क्षेत्र होते "मोबाईल फोन" आणि कंपनीचे नाव "नोकिया" !
आजही ‘नोकिया’ अस्तित्वात आहे. पुन्हा B2B कडे वळली आहे. कदाचित पुन्हा उभारी घेईल.पण सध्या तरी ती आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देते— यश कितीही मिळालं तरी ते ग्राह्य धरता येत नाही ! कितीही वेळा तुम्ही स्वतःला नव्याने घडवलं तरी, ते सतत करत राहणं आवश्यक आहे. !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !