"Takes No Talent" – यश मिळवण्याचा सोपा पण प्रभावी मंत्र

मी कॉर्पोरेट मध्ये नोकरी करत असताना एकदा एका सेल्स ट्रेनिंग मध्ये सहभागी झालो होतो. तेव्हा ट्रेनरने आम्हाला TNT बद्दल सांगितलं. TNT म्हणजे Takes No Talent !
आपण "टॅलेंट"(प्रतिभा) ला जास्त महत्व देतो. प्रत्येकाला आपल्या टीम मध्ये Extraordinary Talented लोक पाहिजे असतात. पण प्रत्यक्षात यशासाठी टॅलेंटची भूमिका मर्यादित असते. त्याच्याएवजी TNT कृती करणारे लोक जास्त यशस्वी होऊ शकतात.
TNT म्हणजे अशी कामं, सवयी, कृती ज्या कुणालाही जमू शकतात. त्यासाठी IQ, MBA, वा कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही.
तरीही, ह्याच गोष्टी आपण दुर्लक्षित करतो – कारण त्या "खूपच सोप्या" वाटतात.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

काही T.N.T. सवयी:
- वेळेआधी ५ मिनिटं पोहोचणं
- लक्ष देऊन ऐकणं
- चर्चा झाल्यावर धन्यवाद म्हणणं
- एखाद्यानं मदत केली की त्याचं कौतुक करणं
- स्वतःहून पुढे येऊन जबाबदारी घेणं
- प्रश्न विचारून गोष्टी अधिक समजून घेणं
या सर्व गोष्टी करण्यासाठी काही वेगळं कौशल्य असण्याची गरज नाही. पण या गोष्टीच Differentiator तयार करतात. ठीकठाक ते महान हा प्रवास करणाऱ्या लोकांना TNT गोष्टीच मदत करतात. आणि महत्वाचं म्हणजे हे कुणीही करू शकतो. Takes No Talent !
कोणत्याही यशस्वी व्यक्तीला तिच्या यशाचं गमक विचाराल, तर उत्तर फार वेगळा नसेल.
ते म्हणतील — "मी रोज नेहमीच्या साध्याच गोष्टी केल्या पण सातत्याने योग्य प्रकारे केल्या."
तेवढंच.
अमिताभ बच्चन एकदा म्हंटले होते - "माझ्या टॅलेंटमुळे मला पहिलं ब्रेक मिळाला खरा, पण माझं वेळेवर पोहोचणं, स्क्रिप्ट लक्षपूर्वक वाचणं, प्रत्येक व्यक्तीशी नम्रतेनं बोलणं – ह्याच गोष्टींनी मला फिल्म इंडस्ट्रीत टिकवलं!"
त्यांनी प्रत्येक सिनेमाच्या सेटवर नेहमी वेळेआधी पोहोचणं, सर्व टीमला आदर देणं, आणि शिस्तबद्ध दिनचर्या ही वयाच्या ८०व्या वर्षीही कायम ठेवली आहे. या सर्व गोष्टी Takes No Talent! या प्रकारात मोडतात. ह्यामुळेच ते आजही सर्वांचा आदर कमावतात.
"द वॉल" राहुल द्रविड म्हणजे टॅलेंटपेक्षा TNT सवयींचं उत्तम उदाहरण.
नेटमध्ये इतरांपेक्षा अधिक वेळ सराव करणे, ड्रेसिंग रूममध्ये सर्वात शेवटी गेला तरी सामान स्वतः उचलून ठेवणं , जूनियर खेळाडूंना मार्गदर्शन करणं, कधीच चर्चेचा केंद्रबिंदू न बनणं, टीमच्या गरजेनुसार रोल स्वीकारणे या सर्व राहुलने दाखविलेल्या TNT सवयींच आहेत.
आपण पण अगदी सहज या गोष्टी प्रयत्नपूर्वक अमलात आणू शकतो. TNT (Takes No Talent) मधल्या तुमच्या आवडत्या ३ सवयी निवडा.
आणि त्या रोज आचरणात आणा.
लक्षात ठेवा — लहान बदलच मोठं यश घडवतात.
कारण लीडरशीप म्हणजे टॅलेंट नव्हे...
लीडरशीप म्हणजे योग्य गोष्टी पुन्हा पुन्हा करणं.

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती