There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
अन्न , वस्त्र आणि निवारा या केवळ तीनच गरजा राहिलेल्या नाहीत....वीज, इंटरनेट, स्मार्टफोन या आणखी काही गरजा गेल्या शतकात तयार झाल्या....आता आणखी एक नवीन गरज यामध्ये समाविष्ट होत आहे... ती म्हणजे AI ! एक अशी गरज जी प्रत्येक नागरिकाला विनामूल्य उपलब्ध करून देण्याची इच्छा एका देशाला झाली !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/IBWPzOHwlSmJtDY3wUyW0y
येथे क्लिक करा.
================
संपूर्ण देशाला ChatGPT Plus ची मोफत आणि अमर्यादित ऍक्सेस देणारा UAE, जगातील पहिला देश ठरला आहे.
हो – GPT-4o, जो सामान्यतः $20/महिन्याला मिळतो, तो आता तिथल्या प्रत्येकासाठी फुकट उपलब्ध आहे.
आता विचार करा —
AI म्हणजे फक्त टॉप कंपन्यांचा, इंजिनीअर्सचा किंवा Silicon Valley चा विषय राहिलेला नाही.
तो आता विद्यार्थ्यांच्या हातात आहे, छोट्या व्यवसायिकांच्या हाती आहे, आणि डॉक्टर, शिक्षक, शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचतोय.
शाळेतील विद्यार्थी आता GPT-4o सोबत अभ्यास करू शकतात. नवउद्योजक बाजारातील ट्रेंड समजू शकतात. डॉक्टर diagnostic चॅटबॉट वापरून उपचारात सहाय्य घेऊ शकतात
ही एक फार मोठी गोष्ट आहे. AI मध्ये ‘डेमोक्रसी’ कधी आली नव्हती.
ती आत्ता आलीये — तीही राष्ट्रीय पातळीवर.
हे केवळ ChatGPT ची मोफत सबस्क्रिप्शन नाही . ही एक भविष्यातील सत्तेची नव्या प्रकारे उभारणी आहे.
जसं पूर्वी तेलामुळे देश सत्ताधीश बनायचे,
तसं आता AI साठी भांडवल, डेटा आणि स्केलेबल इन्फ्रास्ट्रक्चर हवंय.
UAE हे समजून पावलं टाकतंय.
ते केवळ 'तंत्रज्ञान स्वीकारत' नाही — ते त्याला दिशा देतंय !
यापुढे अनेक देश याच पावलावर पाऊल ठेवतील.
एक AI स्पर्धा सुरू झाली आहे —
ज्यात लढाई तंत्रज्ञानाची नाही, प्रवेशाच्या अधिकाराची आणि संधीच्या समानतेची आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/IBWPzOHwlSmJtDY3wUyW0y
येथे क्लिक करा.
================
आपण त्यात सहभागी आहोत का, की केवळ प्रेक्षक आहोत?
जिथे आपण नागरिकांना पुरेसं The age of national-scale AI has begun.धान्य, वीज आणि वैद्यकीय उपचार देण्यासाठी प्रयत्न करतोय तिथे काही देशांना नागरिकांसाठी advance AI देण्याची इच्छा आणि ऐपत दोन्ही आहे. अर्थात ही दोन देशांची तुलना नाही. दोन्ही देशांचे प्रश्न आणि scale वेगळे आहेत. आपण नेमके कुठे आहोत, जग कुठे चालले आहे आणि भविष्यासाठी आपला प्राधान्यक्रम काय असला पाहिजे याची जाणीव प्रत्येक भारतीयाला होणे महत्वाचे !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !