There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
हात खिशात गेला
मोबाईल बाहेर आला
चेहरा बघून मोबाईल लॉक आपोआप उघडला
हाताची बोटे सराईतासारखी त्या अँप आयकॉन कडे गेली.
अँप उघडले.
स्क्रोल केले.
एका मित्राने पत्नीसोबत फिरायला गेला होता त्याचे फोटो पोस्ट केले होते.
फोटोला लाईक केलं
अंगठा दाखवून कमेंट केलं
स्क्रोल केलं
एका गोड बाळाचा फोटो दिसला,
एखादी सेल्फी दिसली
आणि त्यासोबत एखादे मोटिव्हेशनल वाक्य.
कुणाचं प्रमोशन झालं होतं.
पुन्हा लाईक केलं
पुन्हा अंगठा दाखविला
दोन ठिकाणी WOW आणि nice असं लिहिलं
पुन्हा स्क्रोल केलं .
एखादं मीम दिसलं .
‘लाईक’ दाबलं.
‘छान’ लिहिलं.
आणखी स्क्रोल केलं:
कॅफे मधील गरमागरम कॉफीचा फोटो,
एका नेत्याच्या हास्यास्पद वर्तनाचा व्हिडिओ,
एक छानसा वेडिंग फोटोशूट,
कुणा अभिनेत्रीचा बोल्ड फोटो,
पुन्हा मीम्स,
जुने जोक्स,
स्पॉन्सर्ड पोस्ट्स.
लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल
हळूहळू सगळं काही ऑटोपायलटवर चालतं.
बोटं आपलं काम सुरूच ठेवतात –
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
सरावाची झालेली,
सर्व अवयवांनी पाठ केलेली,
यंत्रमानवासारखी एक हालचाल.
सैनिकांचा तालबद्ध मार्च असतो
तसा सगळ्यांचा चालू असतो ....
लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल !
काही काळापूर्वी हे काम करताना आपण सजग असायचो.
मानवी मेंदू इथे काहीच ऑटोमॅटिक करत नव्हता.
मेंदूंला जास्त काहीतरी पाहिजे असायचं :
एखादी नवीन कल्पना,
एक वेगळीच स्टोरी,
एक काळजाला भिडणारी पंचलाइन,
एक थक्क करणारा प्रवास
भावना, कल्पनाशक्ती, आणि व्यक्तिमत्त्वावर चालणारा
तो मानवी कार्यक्रम आता कालबाह्य झालाय.
त्याची जागा घेतलीय अल्गोरिदमने.
आता लक्षवेधी काम करणे गरजेचे नसते
आता केवळ लक्ष वेधणे गरजेचे असते
विचित्र कपडे, नृत्य किंवा हावभावांनी लक्ष वेधून घेता येत असेल
उच्च दर्जाचं कंटेन्ट का तयार करायचं ?
जर एखाद्या मीमने वायरल होता येत असेल तर
चार पानांचा अभ्यासपूर्ण मजकूर का लिहावा ?
इन्फ्लुएंसरचा रीट्विट पुरेसा असेल तर
आकर्षक जाहिरातींवर डोकं का खपवायचं?
चांगल्या कन्टेन्टवर कशाला मेहनत करायची,
जर ते काही क्षणात इंटरनेटच्या अफाट समुद्रात गाडलं जाणार आहे?
लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल
या नव्या जगात इतकंच पुरेसं आहे.
जेव्हा “ठीकठाक” पुरेसं असतं, तेव्हा कष्ट आणि खोल विचारांचा उपयोग काय?
माणसांनीही कोणतेही प्रश्न न विचारता या नव्या जगाशी पटकन जुळवून घेतलं आहे.
हा ऑटोमॅटेड प्रोग्रॅम सुरळीत चालतोय.
उरलेलं सगळं अल्गोरिदम बघून घेत आहे.
मेंदू गोठलाय...बोटं चालतायत....
लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल !!
बस...
आता या पोस्टलाही स्क्रोल करा...पुढे जा
काही लोक अर्ध्यावर पुढे गेलेही असतील...
....लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Salil Chaudhary
A California-based travel writer, lover of food, oceans, and nature.