There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
स्टीव्हन स्पीलबर्गने जेव्हा 'जॉज' (Jaws) चित्रपट बनवला, तेव्हा तो २७ वर्षांचा होता.
त्या चित्रपटाचे बजेट फक्त 4 मिलियन डॉलर्स होते.
स्पीलबर्गला संधी मिळण्याचे हेच एकमेव कारण होते.
तो नवखा आणि अपरिचित होता, एक लहान मुलगाच !
हा एक कमी बजेटचा सिनेमा असल्यामुळे, त्याला संधी देण्याचा धोका निर्मात्यांनी पत्करला होता.
तसं म्हंटलं तर या चित्रपटाकडून काही फार अपेक्षा नव्हत्या. एक मोठा भयंकर प्राणी जो समुद्रात पोहणाऱ्या माणसांना खात फिरतो. असा एक साधा सरळसोट गॉडझिला सारखा "राक्षसी" संकल्पनेचा चित्रपट होता.
पण सुरुवातीपासूनच स्टीव्हनला चित्रीकरण कसे करावे याबबाबत मोठी समस्या जाणवू लागली.
चित्रपटातील मुख्य कथानक असलेला राक्षस, म्हणजे शार्क स्पेशल इफेक्ट्सच्या साहाय्याने तयार करणे जमत नव्हते. स्पीलबर्गने युनिव्हर्सल स्टुडिओकडून एक चांगला शार्क बनवून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
पण सर्वोत्तम स्पेशल इफेक्ट्सवाले तंत्रज्ञ त्या वर्षी स्टुडिओच्या इतर दोन सर्वात मोठ्या चित्रपटांवर काम करत होते.
ते चित्रपट होते ‘एअरपोर्ट ७५’ (Airport 75) आणि ‘हिंडेनबर्ग’ (Hindenburg).
हे असे चित्रपट होते, जे भरघोस यश मिळवतील असे प्रत्येकाला वाटत होते.
त्यामुळे स्पीलबर्ग कडे त्याच्यासारखीच नवखी टीम देण्यात आली होती. स्पीलबर्ग अशा राक्षसासोबत अडकला होता, ज्याला तो स्क्रीनवर दाखवूच शकत नव्हता.
https://www.facebook.com/share/p/1EahLnE3yu/
मग त्याला एक विचार आला:
"जर तुम्ही ते दाखवू शकत नसाल, तर ते दाखवू नका !"
एखादी गोष्ट थेट दाखवण्यापेक्षा तिची कल्पना प्रेक्षकांना सतत करायला लावणे अधिक प्रभावी ठरू शकते. कारण कल्पनाशक्ती ही वास्तवापेक्षा अधिक शक्तिशाली असते.
म्हणून स्पीलबर्गने एक वॉटरप्रूफ बॉक्स बनवून घेतला ज्यामुळे त्याला पाण्याखाली चित्रीकरण करता आले. हा कॅमेरा शार्कच्या दृष्टिकोनातून (POV) चित्रीकरण करत होता.
कॅमेरा शिकार शोधत पाण्यातून फिरतो.
कट टू लाटांच्या वर, लोकांचा दृष्टिकोन पाहण्यासाठी: आनंदाने पोहणारे लोक.
कट टू लाटांच्या खाली, शार्कचा दृष्टिकोन पाहण्यासाठी: पोहणाऱ्या लोकांचे पाय म्हणजे अन्न.
वरच्या लोकांना काहीही दिसत नाही.
हे अधिकच भयानक वाटत होते.
कधीकधी पाण्याखालचा कॅमेरा खरोखरच शार्कचा दृष्टिकोन असे, जो हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
कधीकधी तो नसे.
कधीकधी तो फक्त एक साधा पाण्याखालचा शॉट असे.
प्रेक्षकांना कळत नसे की पुढे काय घडणार आहे.
आणि काहीतरी माहीत असण्यापेक्षा, काहीच माहीत नसणे ही एक मोठी भीती आहे.
निश्चितता म्हणजे भीती.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================
पण अनिश्चितता म्हणजे दहशत.
चित्रपटात जिथे पूर्ण शार्क दाखवावा लागला तिथे ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन खऱ्याखुऱ्या शार्क्सचे शूटिंग करण्यात आले. पण त्या शार्क्स आकाराने लहान होत्या. त्यावर उपाय म्हणून इतर गोष्टी जसे की माणसे, बोट, पाण्यातील पिंजरा आकाराने छोट्या केल्या आणि मग प्रत्यक्ष शूटिंग करण्यात आले. खऱ्याखुऱ्या शॉट्स मुळे कुठेही "कृत्रिम"पणा जाणवला नाही.
शार्कचा वापर करता न येणे, ही खरंतर स्पीलबर्गसाठी घडलेली सर्वोत्तम गोष्ट होती.
त्याला माहित होते की चित्रपटाचा खरा स्टार शार्क आहे.
पण त्याच्या अनुपलब्धतेमुळे त्याला सर्व काम कॅमेऱ्याकडूनच करून घेण्यास भाग पडले.
'Jaws' हा $100 मिलियन कमावणारा पहिला चित्रपट होता आणि त्याने एकूण $500 मिलियन पेक्षा जास्त कमाई केली. हे सर्व घडले कारण स्पीलबर्गला एका समस्येवर वेगळा creative मार्ग शोधावा लागला. ज्यामुळे तो एक जबरदस्त दिग्दर्शक म्हणून ओळखला गेला.
एक महान चित्रपट निर्माता, वयाच्या २७ व्या वर्षी.
एलियाहु गोल्डरॅट हे एक जगप्रसिद्ध मॅनेजमेंट कन्स्लटंट होते. त्यांनी "Theory of Constraint" चा सिद्धांत मांडला होता. या सिद्धांताची मूळ कल्पना अशी आहे की कोणत्याही साखळीची ताकद तिच्या सर्वात कमकुवत दुव्यावर अवलंबून असते. या कमकुवत दुव्यालाच 'कन्स्ट्रेंट - Constraint' म्हटले जाते. संपूर्ण प्रणालीची गती आणि उत्पादन क्षमता याच एका अडथळ्यावर अवलंबून असते.
त्या Constraint ला exploit करणे म्हणजेच त्याचाच पुरेपूर वापर करणे.
संपूर्ण प्रणाली सुधारण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर लक्ष देण्याऐवजी फक्त सर्वात मोठ्या अडथळ्यावर लक्ष केंद्रित (Exploit) करा. यामुळे कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त फायदा मिळवता येतो. स्पीलबर्गने कॅमेऱ्यात शार्क दाखविता येत नाही म्हणून कॅमेऱ्यालाच शार्क बनवलं ! त्याने constraint ला पुरेपूर exploit केलं !
कमी भांडवल, कमी मनुष्यबळ, कमी शिक्षण, कमी अनुभव यापैकी काही Constraints आपल्याही कामात असतील. सर्व गोष्टी मुबलक असल्या तर लोक प्रयोगशील राहत नाही. पण या मर्यादित गोष्टीच चाकोरीबाहेरचा विचार करायला भाग पाडतात !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !